पुणे ते महाड असा प्रवास करण्यासाठी भोर, वरंध घाटमार्गे तर ताम्हिणी घाट मार्गे असे दोन प्रमुख रस्ते आहेत.
पुणे ते महाड असा प्रवास करण्यासाठी भोर, वरंध घाटमार्गे तर ताम्हिणी घाट मार्गे असे दोन प्रमुख रस्ते आहेत.Sakal

Raigad News : महाड-पुणे नव्या मार्गासाठी ३० कोटी

पुणे ते महाड असा प्रवास करण्यासाठी भोर, वरंध घाटमार्गे तर ताम्हिणी घाट मार्गे असे दोन प्रमुख रस्ते आहेत.

महाड : पुण्याहून महाडमध्ये येण्याकरिता तिसऱ्या नव्या मार्गाची निर्मिती होणारा आहे. यासाठी जवळपास ३१ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. नवीन मार्गामुळे स्वराज्याची राजधानी असणाऱ्या राजगड व रायगड ही दोन महत्त्वाची स्थळे पाहणे शिवप्रेमींना सोयीचे होणार आहे. शिवाय प्रवासातील वेळ व इंधनाची मोठी बचत होईल.

पुणे ते महाड असा प्रवास करण्यासाठी भोर, वरंध घाटमार्गे तर ताम्हिणी घाट मार्गे असे दोन प्रमुख रस्ते आहेत. वरंध घाट रस्ता पावसाळ्यामध्ये अतिशय धोकादायक होत असल्‍याने अनेकदा बंदच असतो. त्यामुळे बहुतांशी वाहतूक ताम्हिणी घाट मार्गे होते.

त्‍यामुळे प्रवासातील अंतरहीवाढते. महाडमधील नागरिकांनी केली अनेक वर्ष या दोन घाटांना पर्याय असणारा अन्य जवळचा पुणे-मढेघाटमार्गे महाड असा रस्ता तयार करावा अशी मागणी केली होती.

महाड औद्योगिक क्षेत्रासाठीही हा रस्‍ता सोयीचा असल्‍याने सर्वेक्षणही झाले होते. परंतु वेल्हे ते मढेघाटमार्गे खडकाळ मार्गामुळे कामात तांत्रिक अडचणी येत होत्‍या. त्यामुळे नव्याने भोरडी, पिशवी, गोकुळशी, पांगारी ते महाड तालुक्यातील शेवते हा पर्यायी रस्ता भोरचे आमदार संग्राम थोपटे यांनी सुचवला होता. त्यानुसार या ठिकाणची पाहणी करून अहवाल राज्य सरकारकडे पाठवण्यात आला होता.

कमी अंतराचा मार्ग

पुणे-महाड तयार होणारा नवीन रस्ता १८ किलोमीटर लांबीचा आहे. १३ किलोमीटरपर्यंतच्या या रस्त्याला मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा दोनमधून २५ कोटी ३२ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

तर उर्वरित पाच किलोमीटरसाठी पाच कोटींचा निधी अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आला आहे. नवीन रस्ता कमी अंतराचा असल्यामुळे पुण्यातून महाड तसेच रायगडला जाण्यासाठी प्रवासाचा वेळ वाचणार असल्याने इंधन व पैशाची बचत होईल.

याशिवाय राजगड व रायगड या दोन स्वराज्याच्या राजधान्या पर्यटकांना पाहता येणार असल्याने या भागातील पर्यटन व्यवसायालाही चालना मिळेल. सध्या पुणे, भोर, वरंध घाटमार्गे महाड हे अंतर १४० किलोमीटर आहे तर पुणे-ताम्हिणी घाटमार्गे महाड हे अंतर १६० किलोमीटर आहे. नवीन तयार होणारा रस्ता १२० किलोमीटर अंतराचा आहे.

असा आहे नवीन रस्‍ता

पुणे व महाड येथील सर्वात कमी अंतराचा हा रस्ता असेल. रस्त्याच्या कडेला गटारे तसेच साईडपट्ट्या असतील. जवळपास साडेसात मीटर रुंदी असेल. पिशवी गावाजवळ काही ठिकाणी रस्‍त्‍याचे काँक्रिटीकरण केला जाणार आहे.

पिशवी आणि गुगूळशी या गावाजवळ दोन मोठे पूल बांधले जाणार आहेत. या मार्गात ९४ मोठ्या मोऱ्या तर ९०० मीटरची संरक्षक भिंत बांधली जाणार आहे. महाडपासून पुणे येथे प्रवास करणारे अंतर २० ते ४० किलोमीटरने कमी होणार आहे.

महाड-पुणे सर्वात जवळच्या अंतराचा मार्ग होणार असून त्‍यामुळे धोकादायक वरंध घाटमार्गाला पर्याय तयार होणार आहे. औद्योगिक क्षेत्रालाही हा रस्‍ता जवळचा रस्ता असल्याने उद्योजकांना महत्त्वाचा पर्याय ठरणार असून रायगड,

राजगड, शिवथर घळ, वाळण कोंडी अशी अनेक पर्यटन स्थळांवर पोहोचणे सहज शक्य होणार आहे. पर्यटन व्यवसायाला चालना मिळणार असल्‍याने रोजगाराच्या संधी उपलब्‍ध होतील. रायगड व पुणे जिल्ह्यातील या मार्गावर येणाऱ्या अनेक गावांचा विकास होईल.
- संग्राम थोपटे, आमदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com