शेअर निर्देशांकांची दुसरी घसरण

शेअर निर्देशांकांची दुसरी घसरण

शेअर निर्देशांक
१९३ अंशांनी कोसळले
मुंबई, ता. १ ः भारतीय शेअर बाजार निर्देशांक आजही वरच्या पातळीवर टिकू शकले नाहीत. त्यांच्यात सुमारे पाव टक्का घसरण झाली. वरच्या पातळीवर नफावसुली झाल्याने सलग दुसऱ्या दिवशीही निर्देशांक कोसळले. आज सेन्सेक्स १९३.७० अंश, तर निफ्टी ४६.६५ अंशांनी घसरला.
भारताच्या ‘जीडीपी’चा तपशील चांगला आला. कंपन्यांचे उत्पादनही जवळपास तीन वर्षांच्या उच्चांकी स्तरावर गेले. वाहन विक्रीचे आकडेही चांगले आले. तरीही आज शेअर बाजाराला फार नफा दाखविता आला नाही. दिवसभर शेअर बाजार विशिष्ट टप्प्यातच फिरत होते. सेन्सेक्स आज ६२ हजारांच्या खालीही गेला नाही. मात्र, तो ६३ हजारांच्या जवळपासही जाऊ शकला नाही. शेवटच्या तासात विक्रीचा मारा आल्याने निर्देशांक घसरले. दिवसअखेरीस सेन्सेक्स ६२,४२८.५४ अंशांवर, तर निफ्टी १८,४८७.७५ अंशांवर स्थिरावला.
आज बँका, वित्तसंस्था आणि धातूनिर्मिती कंपन्या या क्षेत्राच्या शेअरच्या भावात घसरण झाली; तर आयटी, औषध निर्मिती कंपन्या आणि बांधकाम व्यवसाय यांच्या शेअरचे भाव वाढले. निफ्टीत अपोलो हॉस्पिटल सव्वाचार टक्क्यांपेक्षा जास्त वाढला. डीव्हीज लॅब अडीच टक्के, बजाज ऑटो, टाटा मोटर, हीरो मोटोकॉर्प हे शेअर दीड टक्का वाढले; तर निफ्टीत कोल इंडिया पावणेपाच टक्के, तर कोटक बँक सव्वाचार टक्के घसरला. एअरटेल पावणेतीन टक्का घसरला आणि एसबीआय लाईफ, एचडीएफसी लाईफ दोन टक्के घसरले. सेन्सेक्समध्ये हिंदुस्तान युनिलिव्हर, एशियन पेंट, सनफार्मा, टीसीएस, नेस्ले, विप्रो या शेअरचे भाव वाढले; तर आयसीआयसीआय बँक, आयटीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक या शेअरचे भाव कमी झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com