‘१५० सेवाकर्मी प्लस’मध्ये मुंबई विद्यापीठ अव्वल

‘१५० सेवाकर्मी प्लस’मध्ये मुंबई विद्यापीठ अव्वल
Published on

‘१५० सेवाकर्मी प्लस’मध्ये
मुंबई विद्यापीठ अव्वल
मुंबई, ता. २८ ः दीडशे दिवसांच्या सेवाकर्मी प्लस कार्यक्रमात अव्वल आलेल्या मुंबई विद्यापीठास आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरविण्यात आले. सह्याद्री अतिथीगृहातील कार्यक्रमात कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांचा हा सन्मान स्वीकारला. प्र. कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे आणि कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे उपस्थित होते.
प्रशासकीय सुधारणा निकषांमध्ये राज्यातील एकूण १३ अकृषी विद्यापीठांपैकी मुंबई विद्यापीठाने सर्वोत्कृष्ट कामगिरी करत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. मुंबई विद्यापीठाला एकूण १०० गुणांपैकी सर्वाधिक ८२ गुण मिळाले आहेत. ‘विकसित महाराष्ट्र २०४७’कडे वाटचाल करीत असताना पारदर्शक, गतिमान आणि उत्तरदायी सुशासनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शासनातर्फे प्रशासकीय सुधारणाअंतर्गत विविध प्रशासकीय विभागांच्या आस्थापनांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक प्रगतीचे मूल्यांकन करण्याच्या उद्देशाने १५० दिवसांचा सेवाकर्मी प्लस कार्यक्रम ६ मे ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत राबविण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com