लॅण्डस्केप डिझायनिंग ऑनलाइन प्रशिक्षण
लॅण्डस्केप डिझायनिंग
ऑनलाइन प्रशिक्षण
पुणे, ता. १९ : लॅण्डस्केप नियोजन व डिझायनिंग यात करिअरला भरपूर वाव आहे. हे लक्षात घेता सकाळ ‘एसआयआयएलसी’ आणि ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटी (एआयएसएसएमएस) यांच्यावतीने ‘लॅण्डस्केप डिझायनिंग’ या ८० तासांच्या ऑनलाइन व ऑफलाइन अभ्यासक्रमाला २५ नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. या अभ्यासक्रमाची रचना विद्यार्थी तसेच नोकरदार डोळ्यासमोर ठेवून केली आहे. लेखीबरोबरच प्रात्यक्षिक अनुभवासाठी विविध रचनेच्या उद्यानांना, साइट प्रकल्प, क्षेत्र भेटीचे आयोजन केले आहे. अभ्यासक्रमामध्ये झाडे, झुडपे, वेलींच्या लॅण्डस्केपिंगसाठी शास्त्रीयदृष्ट्या वापर, रस्ते, उद्याने, लॅण्डस्केपचे नियोजन, बांधकाम रचना, नियोजन, प्रकल्प नियोजन व लॅण्डस्केप प्रकल्प डिझायनिंग, खर्चाचे नियोजन, ऑटोकॅड सॉफ्टवेअर, पर्यावरण आणि कायदेविषयक बाबींचा समावेश आहे. अभ्यासक्रमांसाठी बारावी उत्तीर्ण, कुठल्याही शाखेचा पदवीधर, व्यावसायिक, नोकरदार, गृहिणी प्रवेश घेऊ शकतात.
संपर्क : ९८८१०९९४२६
शेतकरी उत्पादक कंपनी प्रशिक्षण वर्ग
शेतकरी उत्पादक कंपन्यांची नोंदणी पूर्ण होताच या कंपनीला सीईओ (मुख्य कार्यकारी व्यवस्थापक) नियुक्त करणे आवश्यक असते. संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणे, व्यवसाय नियोजन करणे, बाजार नियोजन करणे, मनुष्यबळ व्यवस्थापन करणे अशी जबाबदारी या पदावर असते. या पार्श्वभूमीवर २६ नोव्हेंबरपासून पाच दिवसांचे प्रशिक्षण आयोजिले आहे. शेतकरी कंपनी नोंदणी प्रक्रिया व नोंदणीनंतरचे अनुपालन, कृषी व्यवसाय मूल्यसाखळी, शेतमाल पुरवठा साखळी व्यवस्थापन, भांडवल उभारणी व वित्त व्यवस्थापन, कर प्रणाली या क्षेत्रातील रोजगार संधींची व्याप्ती याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
संपर्क : ८९५६७१२६३१, ९३०७६४९०४७
गृहनिर्माण संस्था व्यवस्थापन प्रशिक्षण
गृहनिर्माण संस्था व्यवस्थापक या करिअर संधीविषयीचे तीनदिवसीय प्रमाणपत्र प्रशिक्षण २९, ३० नोव्हेंबर व १ डिसेंबरला आयोजिले आहे. यामध्ये व्यवस्थापनाची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या, व्यवस्थापन समिती विषय व अहवाल लेखन, शेअर्स आणि व्याजाचे हस्तांतरण, देखभाल बिले तयार करणे, टीडीएस भरणे, लेखापरीक्षण अहवाल तयार करणे, वार्षिक विवरणपत्र सादर करणे, सॉफ्टवेअर प्रशिक्षण, चॅट जीपीटीचा वापर आदी विषयांचा समावेश आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यास गृहनिर्माण संस्थांमध्ये व्यवस्थापक म्हणून अर्धवेळ किंवा पूर्णवेळ करिअर संधी उपलब्ध होऊ शकते अथवा गृहनिर्माण संस्थांना विविध सेवा देऊन व्यवसाय सुरू करता येऊ शकतो.
संपर्क : ९३५६९७३४२७
२०२४ मध्ये महारेरा परीक्षा
उत्तीर्ण होण्याची शेवटची संधी
महारेरा सक्षमता प्रमाणपत्र सर्व स्थावर संपदा अभिकर्ते आणि बांधकाम क्षेत्रातील विकसकांकडे स्थावर संपदा व्यवहार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनिवार्य झाले आहे. यासाठी महारेरा मान्यताप्राप्त संस्थेमार्फत होणारे २० तासांचे प्रशिक्षण पूर्ण करणे व ‘आयबीपीएस’तर्फे होणारी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. या परीक्षेसाठी अर्ज करण्याचे पोर्टल खुले झाले आहे. ८ डिसेंबरला हे पोर्टल बंद होणार असल्याने त्यापूर्वी एजंटचे प्रशिक्षण पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे. महारेराची अधिकृत प्रशिक्षण संस्था असणाऱ्या ‘एसआयआयएलसी’तर्फे हे प्रशिक्षण पुणे व नवी मुंबई येथे २५ व २६ नोव्हेंबरला आयोजिले आहे. ऑफलाइनसह ऑनलाइन माध्यमातूनही हे प्रशिक्षण होणार आहे.
संपर्क : ८४८४८२२८५५
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

