

लोगो
इन्स्टंट ड्राय ग्रेव्ही कार्यशाळा
पुणे, ता. ३ ः बाजारपेठेची मागणी, सद्यःस्थितीची गरज पाहता रेडी टू कुक मसाल्यांची वाढती मागणी आहे. यातून नवीन उद्योग सुरू करण्याची संधी लक्षात घेता व्यावसायिक दृष्टीने रेडी टू कुक इन्स्टंट मसाले व ग्रेव्ही कसे तयार करावेत, याबाबत प्रात्यक्षिकासह माहिती देणारी कार्यशाळा शनिवारी (ता. ५) होणार आहे. यामध्ये इन्स्टंट कोल्हापुरी तांबडा रस्सा, पांढरा रस्सा ग्रेव्ही, पंजाबी रेड, व्हाईट, हैदराबादी, महाराष्ट्रीय, पनीर टिक्का मसाला, तंदूर, स्पेशल बिर्याणी, मालवणी, मिसळ, साउथ इंडियन, सावजी, चायनीज, फिश फ्राय ग्रेव्ही हे पदार्थ कृतीसह शिकवले जातील. या उत्पादनांना बाजारपेठेत असलेल्या संधी, प्रॉडक्ट मार्केटिंग, कॉस्टिंग, पॅकिंग, लेबलिंग, आवश्यक मशिनरी इ. विषयी मार्गदर्शन होणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४
आयात-निर्यात व्यवसाय संधी व व्यवस्थापन
आयात-निर्यात व्यापार, व्यवसाय व व्यवस्थापनासंबंधी मार्गदर्शन करणारे दोनदिवसीय प्रशिक्षण शनिवारी (ता. ५) व रविवारी (ता. ६) होणार आहे. नफा मिळवून देणाऱ्या या व्यवसायातील विविध संधींविषयी असणाऱ्या अपुऱ्या माहितीमुळे याचा फायदा अजूनही अनेक व्यापारी व नव्याने व्यवसाय सुरू करू इच्छिणारे नवउद्योजक यांना मिळत नाही. या पार्श्वभूमीवर या प्रशिक्षणाचे आयोजन होत आहे. यामध्ये भारत सरकारचे आयात-निर्यात धोरण (एक्झिम ट्रेड), पेमेंट सेटलमेंट व इनकोटर्म्सची आंतरराष्ट्रीय पातळीवर वापरली जाणारी पद्धत, शिपिंग, मालवाहतुकीचे दर, कंटेनर व्यवस्थापन, विदेश व्यापारातील नवीनतम जागतिक ट्रेंड, निर्यात सुरू करण्यापूर्वीची तयारी, आवश्यक कागदपत्रे, वाटाघाटी कशा कराव्यात याचे कौशल्य, पॅकेजिंग व लेबलिंगचे मानदंड, सरकारच्या विविध निर्यात योजना, निर्यातदारांसाठी डिजिटल साधने आदींबाबत मार्गदर्शन होणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४
दूध प्रक्रिया उद्योग प्रशिक्षण
दूध प्रक्रिया उद्योगातील संधी, दूध संकलन, दुधाची साठवण, पाश्चरायझेशन, होमोजिनाईजेशन, प्रिझर्व्हेशन, क्रिम सेपरेशन, दुधापासून खवा, पेढा, पनीर, लस्सी, दही इ.पदार्थांची कृती, प्रात्यक्षिक, प्रक्रियेसाठी आवश्यक यंत्रसामग्री, प्रकल्प आराखडा, प्रॉडक्ट मार्केटिंग, ब्रॅन्डिंग, अन्न प्रशासन परवाना, शासकीय योजना, बिझनेस प्लॅन इ. विषयी मार्गदर्शन करणारे प्रशिक्षण शनिवारी (ता. ५) व रविवारी (ता. ६) होणार आहे. प्रशिक्षणात खवा, पनीर, लस्सी, दही इ. पदार्थ थेट प्रयोगशाळेत प्रात्यक्षिकद्वारे शिकण्याची संधी आहे. तसेच यशस्वी दूध प्रक्रिया उद्योजक अनुभव सांगणार आहेत.
संपर्क : ८४८४८११५४४
रिअल इस्टेट - जागतिक उद्योजकता सेमिनार
कमी गुंतवणुकीमध्ये सुरू करता येणारा आणि लगेच खात्रीशीर उत्पन्न देणाऱ्या व्यवसायामध्ये रिअल इस्टेट क्षेत्राचा समावेश होतो. प्रतिवर्ष एक कोटी रुपयांपर्यंत यामध्ये कमाई होऊ शकते, असा अनुभव आहे. अल्प भांडवलामध्ये हा व्यवसाय सुरू करून आर्थिक सुबत्ता आणि स्थैर्य मिळवता येते. या क्षेत्रातील व्यवसाय करताना येणाऱ्या अडचणी, आडमार्ग, लागणारी कौशल्ये, व्याप्ती तसेच त्रुटी आणि बारकावे इ. संदर्भात अधिक माहिती देणारा दोन तासांचा सेमिनार ११ ऑक्टोबर सकाळी ११ वाजता आयोजिला आहे. रिअल इस्टेट क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या सर्व वयोगटातील लोकांसाठी सेमिनार खुला आहे. रिअल इस्टेट क्षेत्रात आधीच कार्यरत असणाऱ्या आणि जागतिक बाजारपेठेत जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी सेमिनार उपयुक्त आहे. रिअल इस्टेट प्रशिक्षक व लेखक रोहित गायकवाड मार्गदर्शन करणार आहेत. प्रतिव्यक्ती शुल्क १९९ रुपये.
संपर्क : ९३५६९७३४२७
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.