ई-लुना : वाहतुकीचा 
सर्वोत्तम पर्याय

ई-लुना : वाहतुकीचा सर्वोत्तम पर्याय

24155


वाढत्या इंधन खर्चावर
ई लुना उत्तम पर्याय
पुणे, ता. ५ : वाहतुकीसाठी इंधनाचा वाढता खर्च आणि परवडणाऱ्या वैयक्तिक वाहतुकीचा अभाव या समस्येवर कायनेटिक ग्रीनने ई-लुनाचा (इलेक्ट्रिक व्हेईकल) पर्याय उपलब्ध केला आहे. बाजारपेठेतील महागड्या इलेक्ट्रिक गाड्यांच्या तुलनेत अधिक स्टायलिश आणि मजबूत ई-लुना आर्थिकदृष्ट्या सुलभ आहे. प्रतिमहिना २ हजार ५०० रुपयांपेक्षा कमी हप्त्यात ती उपलब्ध होऊ शकते. सध्या सार्वजनिक वाहतुकीवर अवलंबून असलेल्या किंवा खासगी वाहन नसलेल्या लाखो लोकांसाठी उत्तम पर्याय आहे. केवळ ही कायनेटिक ग्रीन ई-लुना ७९ हजार ९९० रुपये (एक्स शोरूम पुणे किंमत) किमतीत उपलब्ध आहे. एका चार्जिंगमध्ये ही गाडी ११० किलोमीटर धावते. याचा खर्च १० पैसे प्रतिकिलोमीटर आहे. यासोबतच मजबूत बांधणीमुळे ई-लुना १५० किलोपर्यंतचा भार सहन करू शकत असल्याने दैनंदिन प्रवासापासून ते वितरणापर्यंत विविध गरजांसाठी हा एक व्यावहारिक पर्याय आहे. विशेष म्हणजे ई-लुना ही पाच वर्षांच्या विस्तारित वॉरंटीसह उपलब्ध आहे. समाजातील सर्व घटकांसाठी आर्थिक संधीची दारे खुली करणारी ई-लुना हे ईव्ही क्रांतीमधील भारताच्या आत्मनिर्भरता व क्षमतेचा पुरावा आहे. ई व्ही केवळ पर्यावरणाच्या दृष्टीने पूरक नसून आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणारीही असू शकते, हे ई-लुनाने सिद्ध केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com