प्रमाणपत्र नसलेल्या एजंटवर 
‘महारेरा’चा कारवाईचा बडगा

प्रमाणपत्र नसलेल्या एजंटवर ‘महारेरा’चा कारवाईचा बडगा

प्रमाणपत्र नसलेल्या एजंटवर
‘महारेरा’चा कारवाईचा बडगा
पुणे, ता. ६ : प्रशिक्षण व प्रमाणपत्र नसणाऱ्या रिअल इस्टेट एजंटवर धडक कारवाई करत तब्बल २० हजार एजंटची नोंदणी ‘महारेरा’ने नुकतीच रद्द केली आहे. महारेराने आता नवीन एजंट नोंदणी व नोंदणीचे नूतनीकरण बंद केले आहे. यापुढे एजंटकडे सक्षमता प्रमाणपत्र असेल तरच नवीन नोंदणी करता येईल अथवा मुदत संपलेल्या नोंदणीचे नूतनीकरण करता येईल. ज्या नोंदणीकृत एजंटकडे सक्षमता प्रमाणपत्र नाही, त्यांची रेरा नोंदणी महारेराने रद्द केलेली आहे. नोंदणीकृत रेरा एजंट होण्यासाठी आता २० तासांचे प्रशिक्षण पूर्ण करून प्रमाणपत्र मिळवणे अत्यावश्यक आहे. ‘एसआयआयएलसी’तर्फे होणाऱ्या प्रशिक्षणाची ऑनलाइन व ऑफलाइन बॅच १७ जूनला सुरू होत आहे.
संपर्क : ७३५०००१६०२

लहान मुले, ज्येष्ठांसाठी नेचर वॉक
निमोफिलिस्टच्या सहकार्याने लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांसाठी निसर्गाच्या अद्‍भुत रूपांची ओळख करून देणारी व सलग चार शनिवारी आयोजिलेली शैक्षणिक सहल शनिवारपासून (ता. ८) सुरू होत आहे. शहरातील आणि परिसरातील विविध भूदृश्ये, वन्यजीव, विविध वनस्पती, जीवजंतू, जंगले, उद्याने, पाणथळ जागांचे निरीक्षण, अन्वेषण व मार्गदर्शनपर माहिती यामध्ये सांगितली जाणार आहे. मुलांना नैसर्गिक जगाची सखोल ओळख व्हावी, त्यांची पर्यावरणीय समज वाढावी, आजी-आजोबांच्या काळातील निसर्ग व आजचा निसर्ग यातील फरक समजून येऊन पर्यावरण संवर्धनाची गरज लक्षात यावी, सजीव प्राण्यांबद्दल सहानुभूती वाढावी हा या सहलीमागचा उद्देश आहे. नेचर वॉकला अनुभवी निसर्गशास्त्रज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
संपर्क : ९३५६९७३४२७

वरील सर्व कार्यशाळा व प्रशिक्षणे सशुल्क असून त्यांचे ठिकाण : सकाळ मीडिया सेंटर, सकाळनगर, गेट क्र. १, बाणेर रस्ता, औंध, पुणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com