

यूट्यूब कंटेंट क्रिएटर होण्याची संधी
शिवाजी कचरे यांची ‘यूट्यूब कंटेंट क्रिएटर विथ एआय’ ही चार दिवसांची कार्यशाळा १५, १६, २२ व २३ मार्च रोजी आयोजिली आहे. ज्यांना युट्यूब व इतर माध्यमांद्वारे कंटेंट क्रिएटर व्हायचे आहे अथवा जे आधीच असे क्रिएटर आहेत त्यांना स्वतःची पोहोच वाढवायची आहे अशांना ही कार्यशाळा उपयुक्त ठरणार आहे. वास्तविक उदाहरणे, प्रात्यक्षिकाद्वारे शिकवण्यावर असलेला भर हे कार्यशाळेचे वैशिष्ट्य आहे. कार्यशाळेत युट्युबद्वारे कमाई कशी करता येते याबद्दल संपूर्ण माहिती, स्वतःचे चॅनेल कसे तयार करावे, कथा व पटकथा यांचे लेखन कसे करावे, चांगला व्हिडिओ बनवण्यासाठी कॅमेरा, ध्वनी, प्रकाशयोजना आणि संकलनाचे तंत्र वापरून चांगली सामग्री कशी तयार करता येईल, कंटेंट निर्मितीमध्ये ‘एआय’चा रोल व कंटेंट निर्मितीसाठी कोणती एआय साधने वापरावीत याचे उपयुक्त मार्गदर्शन होणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४
वास्तुशास्त्र नियोजनाविषयी कार्यशाळा
वास्तुशास्त्रानुसार घर, ऑफिस वा दुकान कसे असावे आदींबाबत माहिती करून देणारी ऑनलाइन कार्यशाळा १५ ते २१ मार्चदरम्यान होणार आहे. घर वास्तू दोषमुक्त असावे ही इच्छा बाळगणाऱ्या सर्वांसाठी ही कार्यशाळा उपयुक्त आहे. कार्यशाळेत वास्तुशास्त्र काय आहे, वास्तुदोष कोणते आहेत, त्याचे परिणाम कोणाला जाणवतात, दिशा, उपदिशा, अधिपती देवता आणि पंचतत्व, दिशा आणि प्रभाव, वास्तुपुरुष मंडल, मर्मस्थान, उपमर्मस्थान, जमीन कशी निवडावी, घर नक्की कोठे व कसे बांधले पाहिजे, घर बांधण्यास प्रारंभ कसा करावा, घरातील अंतर्गत रचना कशी असावी, मुख्य दरवाजाची दिशा ओळखणे, दरवाजा कोठे करावा, वास्तुचे आयुष्य आदींबाबत मार्गदर्शन होणार आहे.
संपर्क : ९३५६९७३४२७
अमेझॉनवर विका स्वतःची उत्पादने
अमेझॉनवर उत्पादन विकायचे असेल तर त्याची प्रक्रिया काय आहे, नोंदणी कशी करावी, कोणते कागदपत्रे लागतात, किती दिवस लागतात, हे सर्व करून बिझनेस कसा वाढवायचा, अमेझॉनवर विक्री करण्यास किती खर्च लागतो, सेलर पोर्टल कसे असायला हवे आदींबाबत प्रत्याक्षिकासह मार्गदर्शन करणारी कार्यशाळा १५ मार्च रोजी आयोजिली आहे. कार्यशाळेत उत्पादन कसे लिस्ट करावे, डिलिव्हर करावे, रिटर्न्स असतील तर ते कसे हाताळावे, अमेझॉन ॲपवरती उत्पादन जास्तीत जास्त कसे दिसतील जेणेकरून विक्री वाढेल, ऑफर कशा ठेवायच्या, उत्पादन स्पॉन्सर कसे करायचे, पेमेंट कसे पाहायचे, तत्काळ सपोर्ट कसा घ्यायचा याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
संपर्क : ९३५६९७३४२७
लाकडी घाणा-तेल निर्मिती उद्योग प्रशिक्षण
प्रात्यक्षिकांवर आधारित लाकडी घाणा तेलनिर्मिती उद्योग अर्थात कोल्ड प्रेस्ड ऑइल निर्मिती हे दोन दिवसीय विशेष प्रशिक्षण १५ व १६ मार्च रोजी आयोजिले आहे. यात कोल्ड प्रेस्ड ऑइल म्हणजे काय, तेल उत्पादन, प्रक्रिया प्रकार, तेल बियांच्या जाती, पॅकिंग, ग्रॅन्डींग, मशिनरी, खरेदी, पेंड प्रक्रिया व विक्री, व्यवसायाचे अर्थशास्त्र, सोशल मीडियाद्वारे तेल उत्पादनांचे मार्केटिंग आदिंविषयी मार्गदर्शन होणार आहे. थेट लाकडी घाणा युनिटला भेट तसेच लाकडी घाण्यावर शेंगदाणा, तीळ व खोबरे यांचे तेल उत्पादन कसे घेतात, तसेच लाकडी घाण्याऐवजी वापरल्या जाणाऱ्या कोल्ड प्रेस्ड एक्सपेलर मशिनची माहिती दिली जाईल.
संपर्क : ८४८४८११५४४
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.