

लोगो
ॲग्री कमोडिटी फ्युचर्स मार्केटविषयी कार्यशाळा
कमोडिटी मार्केट म्हणजे नक्की काय, स्पॉट मार्केट आणि फ्युचर्स मार्केट यात फरक काय, इलेक्ट्रॉनिक लिलाव मंचचे कार्य कसे चालते, कमोडिटी बाजारात शेतकरी कंपन्या, गट किंवा वैयक्तिक व्यापारी, प्रक्रियादार, गुंतवणूकदार आदींसाठी काय संधी आहेत, याबाबत मार्गदर्शन करणारी ऑनलाइन कार्यशाळा २२ मार्च रोजी आयोजिली आहे. यात वायदेबाजाराची ओळख, बाजारभाव ठरविणाऱ्या मूलभूत घटकांची माहिती, सेबीसह विविध संस्थांचे नियंत्रण, नियम-अटी, जोखीम व्यवस्थापनातील फ्युचर मार्केटची उपयुक्तता तसेच फ्युचर्स कमोडिटी मार्केटमध्ये खाते कसे उघडावे, ट्रेडिंगची सुरुवात कशी करावी, त्यासाठी आवश्यक मार्जिन, ब्रोकर्सकडील तांत्रिक व मूलभूत रिसर्चचा ॲक्सेस कसा मिळवावा, ट्रेड झाल्यानंतरच्या प्रक्रिया, थेट पोच किंवा डिलिव्हरी घेण्याची प्रक्रिया आदींविषयी मार्गदर्शन करणार आहेत.
संपर्क : ९१५६०१००६०, ८९५६७१२६३१
प्रॅक्टिकल शिका इव्हेंट मॅनेजमेंट
इव्हेंट मॅनेजमेंट हा १० सत्रांचा विकेंड क्रॅश कोर्स रमेश पाटणकर इव्हेंट्स यांच्या संयुक्त विद्यमाने २२ मार्चपासून सुरू होत आहे. यात लाइव्ह फील्ड एक्सपिरियन्स देण्यात येणार असून, दोन सत्रांमध्ये इव्हेंट सेटअप, डेकोरेशन, ड्रेपिंग आणि व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक घेण्यात येईल. अनुभवी आणि नावाजलेल्या मेंटर्सकडून मार्गदर्शन, बजेट मॅनेजमेंट सत्रात इव्हेंट बजेट नीट कसे हाताळावे तसेच कॉर्पोरेट इव्हेंट्स, इव्हेंट मॅनेजमेंटचे महत्त्वाचे पैलू जसे की प्रॅक्टिकल सोल्यूशन्स, लॉजिस्टिक्स हँडलिंग आणि क्रिएटिव्ह एक्सेक्यूशन आदींविषयी मार्गदर्शन होईल. इव्हेंट इंडस्ट्रींना कुशल मनुष्यबळाची वाढती मागणी असून, हा कोर्स करणाऱ्यांना ही कौशल्ये शिकण्याची संधी आहे.
संपर्क : ९८८१०९९७५७
शासकीय ई-निविदा प्रक्रिया प्रशिक्षण
विविध शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक विश्वस्त संस्था, देवस्थाने आता ई-निविदा प्रक्रिया राबवत आहेत. याबाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करणारे प्रशिक्षण २२ व २३ मार्च रोजी आयोजिले आहे. प्रशिक्षणात विविध विभागातील नोंदणी, बीओक्यू भरताना येणाऱ्या अडचणी, टेंडरला लागणारी कागदपत्रे, कागदपत्रे डिजिटली सही करून कशी सादर करायची, स्वतःकडे मशिनरी नसतील तर करावयाचे भाडे करार, निविदापूर्व बैठकीला जाण्यापूर्वी करावयाच्या १५ महत्त्वपूर्ण गोष्टी कोणत्या याबाबत तसेच इतर महत्त्वाच्या तांत्रिक गोष्टींबद्दल सविस्तर मार्गदर्शन होणार आहे. सरकारी कंत्राटदार, सिव्हिल, इलेक्ट्रिकल इंजिनिअर्स, मटेरिअल पुरवठादार, वाहतूक करणारे, कौशल्य विकास क्षेत्रात काम करणारे, बचतगट, मॅनपॉवर सप्लाय एजन्सी व विद्यार्थ्यांसाठी हे प्रशिक्षण उपयुक्त आहे.
संपर्क : ८४८४८११५४४
हायपर लोकल व्यवसायाबाबत प्रशिक्षण
थेट विक्रीसाठी उपयुक्त डी टू सी व्यवसाय मॉडेल असणाऱ्या डार्क स्टोअरबाबत मार्गदर्शन करणारे प्रशिक्षण २२ व २३ मार्च रोजी आयोजिले आहे. यामध्ये हायपर लोकल, डार्क स्टोअर आणि डायरेक्ट-टु-कन्झ्युमर सबस्क्रिप्शन या व्यावसायिक संकल्पनांची ओळख, फायदेशीर व्यवसाय संधीचा शोध घेणे व मूल्यांकन करणे, हायपरलोकल वितरण व्यवस्था आणि डार्क स्टोअर कसे उभारायचे, डिजिटल स्टोअर आणि ऑनलाइन सेवा निर्मिती, ग्राहकशोध, ग्राहक विस्तार आणि मार्केटिंगचे प्रभावी तंत्र, वितरण, ऑटोमेशन आणि सरकारी योजनांची माहिती, व्यवसाय वाढवण्याच्या आणि कमाल नफा मिळवण्याच्या युक्त्या, बिझनेस प्लॅनची ओळख आदींबाबत मार्गदर्शन होणार आहे.
संपर्क : ९३०७६४९०४७, ८९५६७१२६३१
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.