जोय आलुक्कास यांना मानद डॉक्टरेट प्रदान

जोय आलुक्कास यांना मानद डॉक्टरेट प्रदान
Published on

०१७०८
जोय आलुक्कास यांना
मानद डॉक्टरेट प्रदान
चंदीगड, ता. २८ ः चितकारा वि‌द्यापीठातर्फे जोय आलुक्कास ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, उ‌द्योजक जोय आलुक्कास यांना ‘डॉक्टर ऑफ लिटरेचर’ ही मानद पदवी देऊन नुकतेच सन्मानित केले. भारतीय दागिन्यांच्या उद्योगाचे जागतिक पातळीवर आधुनिकीकरण करण्यासाठी, उ‌द्योजकता आणि लोककल्याणासाठी जोय आलुक्कास यांना गौरविले. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक चितकारा, प्र-कुलगुरू डॉ. मधू चितकारा, उपकुलगुरू डॉ. संधीर शर्मा, प्र-उपकुलगुरू डॉ. कविता तरंगी, प्राध्यापक, वि‌द्यापीठाचे अधिकारी आदी उपस्थित होते.
जोय आलुक्कास म्हणाले, ‘हा माझ्या आयुष्यातील एक महत्त्वाचा क्षण आहे. भारताला आधुनिक राष्ट्र बनविण्यासाठी उद्योजकता आणि सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आपण एकत्र आलो पाहिजे.’
डॉ. मधू चितकारा म्हणाल्या, ‘जोय आलुक्कास यांना सन्मानित करताना आम्हाला अभिमान वाटत आहे. त्यांची कारकीर्द म्हणजे केवळ उ‌द्योगाच्याच नव्हे तर संपूर्ण समाजाच्या घडणीसाठी द्रष्ट्या नेतृत्वगुणाच्या ताकदीचे उदाहरण आहे. उत्कृष्टता, संशोधन आणि सामाजिक सहभागाच्या संस्कृतीचे संवर्धन करणे यासाठी विद्यापीठ नेहमीच आघाडीवर असेल.’
याप्रसंगी चितकारा वि‌द्यापीठ आणि जोय आलुक्कास ग्रुप यांच्या दरम्यान सामंजस्य करार झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com