

२३११४
‘नीट-यूजी’च्या निकालात
‘एलन इन्स्टिट्यूट’ची बाजी
पुणे, ता. १६ ः राष्ट्रीय चाचणी संस्थेने (एनटीए) नुकत्याच जाहीर केलेल्या ‘नीट-यूजी २०२५’च्या निकालामध्ये कोटा येथील ‘एलन करिअर इन्स्टिट्यूट’च्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळविले.
निकालात देशातील पहिल्या दहा विद्यार्थ्यांमध्ये एलन करिअर इन्स्टिट्यूटच्या चार विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यामध्ये मृणाल झा (चौथा), केशव मित्तल (सातवा), भव्या झा (आठवा) आणि आरव अग्रवाल (दहावा) यांचा समावेश आहे. आशी सिंग ही बाराव्या क्रमांकावर असून, तिने देशात मुलींच्या श्रेणीत दुसरा क्रमांक मिळविला आहे. ‘नीट-यूजी २०२५’च्या पहिल्या शंभर विद्यार्थ्यांमध्ये एलन करिअर इन्स्टिट्यूटचे ३९ विद्यार्थी आहेत. एलन करिअर इन्स्टिट्यूटच्या संचालकांनी सर्व विद्यार्थी, पालकांचे अभिनंदन केले.
एलन करिअर इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन कुकरेजा म्हणाले की, आम्ही उत्कृष्टतेवर विश्वास ठेवतो. सर्वोत्तम वातावरण, विद्याशाखा यांच्यासोबतच एलन सर्वोत्तम निकाल देत आहे. वैद्यकीय शिक्षणासाठी देशातील सर्वोत्तम संस्था मानल्या जाणाऱ्या ‘एम्स’ संस्थेत प्रवेश घेणारा प्रत्येक चौथा विद्यार्थी हा आमचा होता. एलनच्या १० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.