मॉरिशसमध्ये बृहन्महाराष्ट्र मंडळाचा शतकपूर्ती सोहळा
७०८९४
बृहन्महाराष्ट्र मंडळाचा
मॉरिशसमध्ये शतकपूर्ती सोहळा
पुणे, ता. २५ : मॉरिशस येथील बृहन्महाराष्ट्र मंडळाचा शतकपूर्ती गौरव सोहळा, तसेच महाराष्ट्र मॉरिशस मैत्री यात्रेचे आयोजन यंदा मॉरिशस येथील पोर्ट लुईसमध्ये केले होते. मॉरिशसचे सांस्कृतिकमंत्री महेश गोंदिया, मॉरिशस मराठी मंडळ फेडरेशनचे अध्यक्ष बलराज नारू व मॉरिशस भाजपचे सचिव आतीष बिजॉयनाथ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
‘‘भारत आणि मॉरिशस यांच्यात उत्तम राजनैतिक संबंध आहेत. भारताने मॉरिशसला शैक्षणिक, आर्थिक आणि सुरक्षेच्या क्षेत्रांत खूप मदत केली आहे. मॉरिशसचे पहिले प्रधानमंत्री सर शिवसागर रामगुलाम हे भारतीय वंशाचे होते. आजदेखील मॉरिशसमधील अनेक राजकीय नेते हे भारतीय वंशाचे आहेत,’’ असे आतीष बिजॉयनाथ यांनी सांगितले.
‘‘बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या मराठी मैत्री यात्रेमुळे भारत आणि मॉरिशसचे सांस्कृतिक संबंध अजून दृढ होतील,’’ असा विश्वास बलराज नारू आणि महेंद्र गोंदिया यांनी व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराज व स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या प्रतिमेला हार घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली. बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या स्वागत समितीचे उपाध्यक्ष शेखर अमीन, प्रधान कार्यवाह दिलीप कुंभोजकर आणि ‘शिवसंघ प्रतिष्ठान, पुणे’चे अध्यक्ष नीलेश गायकवाड यांनी मान्यवरांचे स्वागत केले. दीपक कर्पे यांनी सूत्रसंचालन केले. मदन बोबडे यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

