एसआयआयएलसी

एसआयआयएलसी

Published on

आयुर्वेदिक अभ्यंग मसाज कार्यशाळा
मसाज अथवा आयुर्वेदिक अभ्यंग केल्याने आरोग्यासंबंधी तक्रारी दूर होतात व वात-पित्त-कफाचे संतुलन राखले जाते. आरोग्याच्या जागृतीमुळे गेल्या काही वर्षांत सतत वाढत असणाऱ्या या क्षेत्रात तज्ज्ञ व्यावसायिकांची मागणी आहे. याबाबत मार्गदर्शन करणारी तीन दिवसीय कार्यशाळा ११, १२ व १३ जुलैला होणार आहे. कार्यशाळेत अभ्यंग मर्दन संकल्पना, मसाजचे तंत्र, मंत्र व शास्त्र, मसाजचे फायदे, वात-पित्त-कफ प्रवृतीनुसार मसाज, उपयुक्त औषधी तेले, शिरोभ्यंग, पादाभ्यंग, विविध स्ट्रोक्स, स्नेहन, स्वेदन, पावडर मसाज, उदवर्तन, मसाज केव्हा, कधी किती वेळ करावा, कधी करू नये याबाबत प्रात्यक्षिकासाहित मार्गदर्शन होणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४

हेल्दी सूप कार्यशाळा
चालू पावसाळ्यात, रेस्टॉरंट स्टाईल सूप स्वच्छ व आरोग्यदायी पद्धतीने कसे तयार करावे हे शिकवणारी कार्यशाळा १२ जुलैला होणार आहे. कार्यशाळेत टोमॅटो सूप, मोरिंगा सूप, ड्रायफ्रूट सूप, मिलेट सूप, नाचणी सूप, ब्रोकोली विथ क्रीम सूप, कॅप्सिकम कोथिंबीर सूप, मंचाव सूप, पमकीन सूप, मिक्स व्हेज सूप, पालक सूप, मशरूम सूप, अवाकाडो सूप, पीनट विथ क्रीम सूप, स्प्राऊट्स सूप, रागी गार्लिक सूप हे प्रकार शिकवण्यात येणार आहेत. कार्यशाळेदरम्यान सर्व सिक्रेट टिप्स व ट्रिक्स सहभागींना सांगितल्या जातील तसेच पीडीएफ नोट्स दिल्या जातील.
संपर्क : ८४८४८११५४४

आयात-निर्यात व्यवसाय प्रशिक्षण
आजच्या स्पर्धात्मक आणि जागतिकीकरणाच्या युगात व्यापाराला सीमारेषा राहिलेल्या नाहीत. भारतीय उत्पादने जगभरात पोहोचू शकतात, फक्त योग्य मार्गदर्शन, नियोजन आणि धोरणे असणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर १२ जुलैपासून सहा दिवसांचे ‘आयात-निर्यात व्यवसाय संधी व व्यवस्थापन’ हे प्रशिक्षण आयोजिले आहे. प्रशिक्षणात EXIM धोरण, IncoTerms, शिपिंग आणि कंटेनर व्यवस्थापन, दररचना व आंतरराष्ट्रीय मालवाहतूक, तसेच पॅकेजिंग, लेबलिंग, डिजिटल टूल्स आणि सरकारी योजना यावर अनुभवी तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळेल. वाटाघाटी करण्याच्या कौशल्यापासून ते आवश्यक कागदपत्रांची पूर्तता कशी करावी या सर्व बाबींचा प्रशिक्षणात समावेश असणार आहे. स्टार्टअप्स, लघुउद्योजक, व्यापारी आणि नवउद्योजक यांच्यासाठी हे प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त ठरेल.
संपर्क : ८४८४८११५४४

एसआयआयएलसीच्या विविध प्रशिक्षण व कार्यशाळांची माहिती मिळवण्यासाठी व नावनोंदणीसाठी क्यूआर कोड स्कॅन करावा-

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com