‘एफपीसी’साठी ऑनलाइन पुरवठा साखळी व्यवस्थापन प्रशिक्षण
‘एफपीसी’साठी ऑनलाईन
पुरवठा साखळी व्यवस्थापन प्रशिक्षण
कृषी क्षेत्रातील शेतकरी उत्पादक कंपनी (एफपीसी) यशस्वी होण्यासाठी पुरवठा साखळी व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांकडून उत्पादित होणारी कृषी उत्पादने वेळेवर, दर्जेदार व कमी खर्चात ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘एफपीसी’मध्ये योग्य नियोजन, प्रभावी अंमलबजावणी आणि आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा समावेश आवश्यक आहे. या ऑनलाईन प्रशिक्षणाचा उद्देश ‘एफपीसी’ सदस्यांना पुरवठा साखळीची मूलतत्त्वे, खरेदी, साठवण आणि वितरण प्रक्रियेचे नियोजन, नोंद व्यवस्थापन व डिजिटल साधनांचा प्रभावी वापर याबाबत सखोल मार्गदर्शन देणे हा आहे. प्रशिक्षणाद्वारे ‘एफपीसी’ अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि बाजाराशी सुसंगत कशी बनू शकते, यावर भर दिला जाईल. तसेच बाजार संलग्नतेसाठी कृती आराखडा तयार करण्याची प्रक्रिया समजावून सांगितली जाईल. ‘एफपीसी’च्या सर्वांगीण विकासासाठी हे प्रशिक्षण महत्त्वपूर्ण ठरेल.
संपर्क : ९१५६०१००६०
व्यावसायिक चटणी कार्यशाळा
जेवणातील चव वाढविणाऱ्या खमंग, स्वादिष्ट आणि रुचकर अशा विविध पद्धतींच्या महाराष्ट्रीय चटणी प्रात्यक्षिकासह शिकवणारी कार्यशाळा २६ जुलै रोजी आयोजित केली आहे. रोजच्या आहारामध्ये चटण्यांचे सेवन केल्यामुळे आरोग्याला मोठे फायदे होतात. या अनुषंगाने कार्यशाळेत सोलापुरी शेंगदाणा, खोबरे, लसूण, कढीपत्ता, कारले, टोमॅटो, कांदा, पांचाली, थ्री इन वन, आवळा, कोर्टा, जवस अशा विविध प्रकारच्या चटण्या तसेच दक्षिण भारतीय इडली, भात आदींसोबत खाल्ली जाणारी गन पावडर शिकविली जाणार आहे. व्यावसायिक कार्यशाळा असल्याने यामध्ये चटणी व्यवसाय कमी भांडवलामध्ये कसा सुरू करावा, व्यवसायाला असणारी मागणी, त्यामधील नावीन्यपूर्ण पद्धती, मिळणारा नफा, चटणी टिकवण्याची पद्धत व पॅकेजिंग याबद्दलही माहिती दिली जाणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४
लँडस्केप गार्डनिंग कार्यशाळा
घराच्या आजूबाजूला उपलब्ध जागेमध्ये आकर्षक लँडस्केप गार्डन तयार करण्यासाठी लागणारे आवश्यक ज्ञान, गार्डनचे प्रकार, तयार करण्याची तत्त्वे, डिझाईन करण्याची पद्धत तसेच झाडांची निवड, गार्डनमधले रस्ते, बॉर्डरला लावली जाणारी झाडे व व त्यांची निवड आदींविषयी मार्गदर्शन करणारी कार्यशाळा २६ व २७ जुलै रोजी आयोजित केली आहे. कार्यशाळेत लँडस्केप गार्डनिंगचा परिचय, गार्डनमध्ये झाडांच्या वेगवेगळ्या डिझाईन तयार करण्याच्या पद्धती, साईटचे मूल्यांकन व तयारी, लँडस्केपिंग टेक्निक्स, खत व पाणी नियोजन, देखभाल पद्धती, पर्यावरणविषयक विचार, क्लायंट कम्युनिकेशन आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट, सुरक्षा आणि नियम, लँडस्केप गार्डनिंगमधील भविष्यातील ट्रेंड आदींविषयी मार्गदर्शन होणार आहे. लँडस्केपिंगमध्ये करिअरच्या संधी शोधणाऱ्यांना तसेच वैयक्तिक बागकामामध्ये स्वारस्य असणाऱ्यांना कार्यशाळा उपयुक्त आहे.
संपर्क : ८४८४८११५४४
शासकीय ई-निविदा प्रक्रिया प्रशिक्षण
विविध शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक विश्वस्त संस्था, देवस्थाने आता ई-निविदा प्रक्रिया राबवत आहेत. याबाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करणारे प्रशिक्षण २६ व २७ जुलै रोजी आयोजित केले आहे. प्रशिक्षणात विविध विभागांतील नोंदणी, न दिसणाऱ्या निविदासुद्धा कशा शोधायच्या, बीओक्यू भरताना येणाऱ्या अडचणी, निविदा भरण्यास लागणारी कागदपत्रे, कागदपत्रे डिजिटली सही करून कशी सादर करायची, इएमडी व एसडीमध्ये सूट कशी मिळवायची, स्वतःकडे मशिनरी नसतील तर करावयाचे भाडे करार, निविदापूर्व बैठकीला जाण्यापूर्वी करावयाच्या १५ महत्त्वपूर्ण गोष्टी कोणत्या, याबाबत तसेच इतर महत्त्वाच्या तांत्रिक गोष्टींबद्दल सविस्तर मार्गदर्शन होणार आहे.
संपर्क : ९३५६९७३४२७
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.