‘महाराष्ट्र बिझनेस आयकॉन अवॉर्ड्स’चे नाशिक येथे आयोजन

‘महाराष्ट्र बिझनेस आयकॉन अवॉर्ड्स’चे नाशिक येथे आयोजन

Published on

‘महाराष्ट्र बिझनेस आयकॉन अवॉर्डस्‌’चे नाशिक येथे आयोजन
पुणे, ता. २२ : यशस्वी उद्योजकांच्या संघर्षमय प्रवासातून नव्या पिढीला प्रेरणा देणे, तसेच व्यावसायिक नेटवर्किंगसाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘महाराष्ट्र बिझनेस आयकॉन अवॉर्डस्‌ २०२५’ या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा २७ जानेवारी ते ६ फेब्रुवारीदरम्यान नाशिक येथील सोमा व्हाईन व्हिलेज येथे होणार आहे.
हा पुरस्कार सोहळा ‘रिसिल डॉट इन’ (शुअर मी मल्टिपर्पझ प्रा. लि.) यांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. या वेळी उत्पादन, सेवा, शिक्षण, तंत्रज्ञान, आरोग्य, महिला उद्योजकता, स्टार्टअप्स आदी विविध क्षेत्रांतील उद्योजक व संस्थांचा गौरव करण्यात येणार आहे. यावेळी अभिनेत्री वर्षा उसगावकर, सोनाली कुलकर्णी आणि प्रार्थना बेहेरे यांच्यासह असोसिएट पार्टनर व प्रमुख अतिथी म्हणून अजमल खान, सलीम खान आणि किरण पाटील यांची विशेष उपस्थिती असणार आहे. या सोहळ्यासाठी बँकिंग पार्टनर युको बँक, आउटडोअर मीडिया पार्टनर नम्रता ॲडव्हर्टायझिंग, एचआर पार्टनर एचआर पॉलीस आहे. तसेच ‘एमएसएमई’ चे सहकार्य लाभले आहे.
यावेळी कार्यक्रमाचे आयोजक आणि ‘रिसिल’चे संस्थापक सुधीरकुमार पठाडे म्हणाले, ‘लघु ते मोठ्या उद्योगांपर्यंत प्रत्येकाला राज्यस्तरीय ओळख आणि प्रेरणा मिळावी, हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. केवळ पुरस्कार देणे नव्हे, तर उद्योजकांसाठी व्यवसायाचे मोठे जाळे (नेटवर्किंग) निर्माण व्हावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.’
‘राज्यातील उद्योजकांच्या यशोगाथांचा सन्मान होणे गरजेचे आहे. हा उपक्रम नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल,’ असे उसगावकर यांनी सांगितले. राज्यातील प्रस्थापित आणि नवोदित उद्योजकांनी या सोहळ्यात सहभागी होऊन आपल्या व्यवसायाला नवीन ओळख मिळवून द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com