एसआयआयएलसी
महिला दिनानिमित्त आरोग्यावर विशेष कार्यशाळा
महिला दिनाचे औचित्य साधून महिलांच्या हार्मोनल आरोग्यासाठी श्वसन, कपालभाती आणि शंखनाद या नैसर्गिक तंत्रांवर आधारित विशेष आरोग्य कार्यशाळा ८ मार्चला होणार आहे. कार्यशाळा केवळ महिलांसाठी आहे. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत वाढता ताणतणाव, अनियमित दिनचर्या, प्रदूषण आणि चुकीच्या श्वसन पद्धती यांमुळे महिलांमध्ये मासिक पाळीतील अनियमितता, PCOD/PCOS यासारख्या समस्या वाढताना दिसतात. या पार्श्वभूमीवर नैसर्गिक आणि शास्त्रशुद्ध पद्धतींच्या माध्यमातून हार्मोनल संतुलन कसे राखता येईल, याबाबत या कार्यशाळेत मार्गदर्शन केले जाणार आहे. कार्यशाळेत योग्य श्वसन पद्धती, कपालभातीचा वैज्ञानिक उपयोग, शंखनादाचे आरोग्यदायी फायदे, हार्मोनल संतुलनासाठी नैसर्गिक उपाय तसेच अंतर्गत ऊर्जा जागृत करण्याचे मार्ग शिकवले जाणार आहेत.
आयात-निर्यात व्यवसाय प्रशिक्षण
आजच्या स्पर्धात्मक आणि जागतिकीकरणाच्या युगात व्यापाराला सीमारेषा राहिलेल्या नाहीत. भारतीय उत्पादने जगभरात पोहोचू शकतात, फक्त योग्य मार्गदर्शन, नियोजन आणि धोरणे असणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर १४ मार्चपासून ‘आयात-निर्यात व्यवसाय संधी व व्यवस्थापन’ हे प्रशिक्षण आयोजिले आहे. प्रशिक्षणात EXIM धोरण, IncoTerms, शिपिंग आणि कंटेनर व्यवस्थापन, दररचना व आंतरराष्ट्रीय मालवाहतूक, तसेच पॅकेजिंग, लेबलिंग, डिजिटल टूल्स आणि सरकारी योजना यावर अनुभवी तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळेल. वाटाघाटी करण्याच्या कौशल्यापासून ते आवश्यक कागदपत्रांची पूर्तता कशी करावी या सर्व बाबींचा प्रशिक्षणात समावेश असणार आहे. स्टार्टअप्स, लघुउद्योजक, व्यापारी आणि नवउद्योजक यांच्यासाठी हे प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त ठरेल.
आरोग्यदायी बेकरी उत्पादन कार्यशाळा
जास्त साखरेऐवजी मल्टीग्रेन, कमी साखर व नैसर्गिक घटक वापरून आरोग्यदायी बेकरी उत्पादने तयार करू इच्छिणाऱ्या उद्योजक, स्वयं सहाय्यता गट, गृहउद्योग करणाऱ्या महिला व नवउद्योजकांसाठी विशेष हेल्दी बेकरी प्रॉडक्ट्स कार्यशाळा १५ मार्चला आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत हेल्दी ब्रेड, बिस्किटे, कुकीज, केक, बन, पिझ्झा बेस, पफ्स व स्नॅक्स यांची निर्मिती प्रक्रिया प्रत्यक्ष प्रात्यक्षिकासह शिकवली जाणार आहे. तसेच कच्चा माल निवड, उत्पादन खर्च, बिझनेस प्लॅन, ब्रँडिंग व मार्केटिंग यावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. आरोग्यदायी बेकरी व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरणार आहे.
कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) प्रशिक्षण
एनजीओ व सामाजिक काम करणाऱ्या संस्थांना आर्थिक गरज मोठ्या प्रमाणात असते. सीएसआर फंडिंगमधून त्यांना ही गरज भागवता येते. मात्र हे फंडिंग कसे मिळवावे, यासाठीचे नियम व कायदे काय आहेत, संस्थेचा प्रोजेक्ट रिपोर्ट कसा सादर करावा याची बहुतेकांना माहिती नसते. या पार्श्वभूमीवरील सीएसआर प्रशिक्षण १५ मार्च रोजी आयोजिले आहे. यामध्ये सीएसआर नेमके काय आहे आणि काय नाही, सीएसआर कायदा, अंमलबजावणी संस्थांची भूमिका, रिपोर्टींग फ्रेमवर्क, अंमलबजावणी करण्यापूर्वी, दरम्यान आणि नंतरची प्रक्रिया, सरकारच्या अपेक्षा, भूमिका आणि जबाबदाऱ्या, सीएसआर फंडींगसाठी आवश्यक कागदपत्रे व प्रक्रिया आदी बाबींवर मार्गदर्शन होणार आहे.
एसआयआयएलसीच्या विविध प्रशिक्षण व कार्यशाळांची माहिती मिळवण्यासाठी व नावनोंदणीसाठी
संपर्क : ८४८४८११५४४, ८९५६३४४४७२, ८९५६३४४४७१, ९३५६९७३४२७
क्यूआर कोड :
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

