esakal | सलग सुट्ट्यामुळे देवगडात पर्यटन पुन्हा बहरणार 
sakal

बोलून बातमी शोधा

Tourism will flourish again in Devgad Sindhudurg Marathi News

वर्षअखेर म्हणजे मौजमजा असेच काहीसे वातावरण असते. यानिमित्ताने पर्यटका विविध पर्यटनस्थळांना भेटी देतात. यंदा कोरोनामुळे पर्यटनावर काहीशा मर्यादा आल्या असल्या तरीही आता सर्वत्र अनलॉक होत असल्याने पुन्हा एकदा पर्यटन व्यवसाय तेजीत येत आहे.

सलग सुट्ट्यामुळे देवगडात पर्यटन पुन्हा बहरणार 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

देवगड ( सिंधुदुर्ग ) - वर्षअखेरीच्या पार्श्‍वभूमीवर आलेल्या सलग सुट्यांमुळे पुन्हा एकदा किनारपट्टी भाग पर्यटकांनी गजबजण्याची शक्‍यता आहे. उद्यापासून (ता.25) रविवारपर्यंत तीन दिवस बॅंका तसेच शासकीय कार्यालयांना सुट्टी असल्याने अनेकांनी पर्यटनाचे बेत आखले आहेत. स्थानिक हॉटेल यासाठी आरक्षित झाल्याचे चित्र आहे. 

वर्षअखेर म्हणजे मौजमजा असेच काहीसे वातावरण असते. यानिमित्ताने पर्यटका विविध पर्यटनस्थळांना भेटी देतात. यंदा कोरोनामुळे पर्यटनावर काहीशा मर्यादा आल्या असल्या तरीही आता सर्वत्र अनलॉक होत असल्याने पुन्हा एकदा पर्यटन व्यवसाय तेजीत येत आहे.

वर्षअखेरीस पर्यटकांची संभाव्य गर्दी विचारात घेऊन हॉटेल व्यावसायिकांनी आतापासूनच नियोजन करण्यात सुरूवात केली आहे. नाताळच्या निमित्ताने उद्या (ता.25) सर्वांना सुट्टी आहे. त्यानंतर शनिवार, रविवार असल्याने बॅंका तसेच शासकीय कार्यालये बंद राहणार आहेत. सलग सुट्यांचे पर्यटकांकडून नियोजन केले गेले आहे.

वर्षअखेरीच्या पार्श्‍वभूमीवर हॉटेल तसेच निवास न्याहारी व्यवस्थेचे आगावू आरक्षण झाल्याचे सांगण्यात येत आहे. आज सायंकाळपासूनच पश्‍चीम महाराष्ट्रातील पर्यटक येथे आल्याचे चित्र होते. त्यामुळे उद्यापासून रविवारपर्यंत तालुक्‍यातील पर्यटनस्थळे पर्यटकांनी गजबजण्याची शक्‍यता अधिक आहे. विशेषतः मांसाहारीे जेवणाकडे पर्यटकांचा ओढा असल्याने हॉटेल व्यवसायिक सज्ज आहेत. पर्यटकांच्या पसंतीनुरूप मासळी पुरवण्यासाठी नियोजन हॉटेल व्यावसायिकांकडून सुरू असल्याचे दिसते. 

समुद्र किनारी गर्दीची शक्‍यता 
सलग सुट्यांमुळे तालुक्‍यातील श्री क्षेत्र कुणकेश्‍वर, किल्ले विजयदुर्ग, देवगड समुद्रकिनारा येथे पर्यटकांची मोठी वर्दळ जाणवण्याची शक्‍यता आहे. यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर वर्षअखेरीस असणारे मनोरंजनाचे कार्यक्रम रद्द केले आहेत. तरीही पर्यटक निसर्गसौंदर्याच्या सानिध्यात मौजमजा करण्याबरोबरच कोकणी पध्दतीच्या मासळीचा आस्वाद घेण्यात मागे राहणार नाहीत. त्यामुळे वर्षअखेरीचा आनंद समुद्रकिनारी घालवण्यासाठी पर्यटक आतुर आहेत. 
 

loading image