
दापोली : तालुक्यातील मुरुड समुद्रामध्ये डॉल्फिन पाहायला जाणाऱ्या पर्यटकांची बोट उलटली. चालकासह सर्व ११ प्रवाशांनी लाईफजॅकेट घातलेले असल्याने वाचविण्यात यश आले; परंतु एका पर्यटकाची प्रकृती चिंताजनक आहे. रविवार (ता. १६) दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली.