जिवावर बेतले तरी आरेरावी आणि दादागिरी काही थांबेना

राधेश लिंगायत
Sunday, 15 November 2020

कोणतीच यंत्रणा याठिकाणी कार्यरत नव्हती याचीच खंत येथील ग्रामस्थांना वाटत आहे.

हर्णे (रत्नागिरी) : काल ज्या ठिकाणी दोन पर्यटक बुडलेल्याची घटना घडलेली असून देखील आज पुणे साताऱ्यातील आलेले पर्यटक समुद्रामध्ये पोहायला जाण्यास ऐकत नव्हते ग्रामस्थांनी अनेक वेळा बजावून देखील हे पर्यटक त्याच धोक्याच्या ठिकाणी पोहत होते. यावेळी कोणतीच यंत्रणा याठिकाणी कार्यरत नव्हती याचीच खंत येथील ग्रामस्थांना वाटत आहे.

काल याठिकाणी ऐन दिवाळी सणाच्या दिवशी महाड तालुक्यातील ८जण पर्यटक आले होते त्यापैकी ७ जण पोहायला गेले होते. त्यावेळी आरडाओरड झाल्यावर ग्रामस्थांच्या अथ्थक प्रयत्नाने ५ जण वाचले परंतु दोन पर्यटकांना वाचवता आले नाही कारण काल आमवस्येची समुद्राला मोठी भरती होती. ठीक १:३० च्या दरम्यान ही घटना घडली होती. अमावस्या असली की सलग तीन दिवस समुद्राला मोठी भरती असते. येणाऱ्या पर्यटकांना याबाबत काहीही माहिती नसते तरीही आरेरावी आणि दादागिरी करून समुद्र म्हणजे एखादा तलाव समजून पोहायला जातात असाच प्रकार आज सकाळी घडला काही पुण्याचे पर्यटक आले होते आणि काल ज्या ठिकाणी पर्यटक बुडण्याची घटना घडली त्याच ठिकाणी हे पुण्यातून आलेले पर्यटक पोहत होते ग्रामस्थांनी अनेक वेळा सांगून त्यांना समुद्रात जाण्यास मज्जाव करून देखील हे पर्यटक ऐकले नाही. अशी माहिती येथील स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले.

दरम्यान, आता याच्यावर कोणी आळा घालायचा यावर ग्रामस्थांना प्रश्न पडला आहे. कारण लॉकडाऊन नंतर आता पर्यटकांची आवक वाढतच चालली आहे. स्थानिक ग्रामस्थ आपले उद्योग सांभाळतील की वारंवार असे प्रकार घडल्यावर जीव वाचवण्यासाठी धावाधाव करतील. तेंव्हा हर्णे ग्रामपंचायतीकडून याठिकाणी या पाळंदे येथील बीचवर पोहण्यासाठी जो भाग धोकादायक आहे, ज्या ठिकाणी बहुतांशी अपघात झाले आहेत त्याठिकाणी कडक सूचनांचा बोर्ड लावून जीवरक्षकाची व्यवस्था लवकरात लवकर करावी. अशी स्थानिकां कडून तातडीची मागणी होत आहे. 

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tourist drowning incident case ratnagiri