नववर्ष पर्यटनाची देवगड तालुक्याला चाहूल

kokan tourisam
kokan tourisam
Updated on

देवगड - सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचे उत्साही स्वागत करण्याची वेळ जवळ येत असल्याने आता पर्यटकांची आतुरता वाढू लागली आहे. देवगडसह कुणकेश्‍वर, विजयदुर्गला पर्यटकांची आतापासूनच वर्दळ जाणवू लागली आहे. साधारणतः चालू आठवड्याच्या अखेरीपासूनच हॉटेल आरक्षित होत असल्याचे चित्र आहे. पुढील आठवड्यात सलग सुट्यांमुळे पर्यटनामध्ये वाढ होण्याची लक्षणे आहेत.

व्यावसायिक लागले तयारीला

वर्षअखेरीस आता मोजकेच दिवस राहिले. त्यामुळे वर्षअखेरीचे बेत आखण्यास आतापासूनच सुरूवात झाली आहे. पुढील आठवड्यात चौथा शनिवार, रविवार सलग सुटी असल्याने येथील पर्यटकांच्या संख्येत आणखी वाढ होईल. सध्याही येथे पर्यटक येत असून स्थानिक पर्यटनस्थळांवरील गर्दी हळूहळू वाढत आहे. येथील हॉटेलमध्येही पर्यटकांची गर्दी वाढल्याचे दिसते. खास करून उन्हाळी -दिवाळी सुटीत कोकणातील विविध पर्यटनस्थळांना पर्यटकांची वाढती पसंती असते; मात्र काहीवेळा सलग सुट्या आल्यास पर्यटक कोकणच्या प्रवासाचे बेत आखताना दिसतात

कुणकेश्‍वर, विजयदुर्गला पर्यटकांची वर्दळ

जिल्ह्यातील वेंगुर्ले, मालवण याबरोबरच देवगड तालुक्‍यातील विविध पर्यटनस्थळे पाहण्यासाठी पर्यटक आवर्जुन येतात. येथील स्वच्छ समुद्रकिनारे, पराक्रमाची गाथा सांगणारे गडकिल्ले, ताजे मासे व खास कोकणी धाटणीच्या पदार्थांना बाहेरील पर्यटकांकडून विशेष पसंती असल्याचे दिसते. पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे गेल्या काही वर्षात येथील निवास न्याहारी केंद्रातही वाढ होवू लागली आहे. पर्यटकांच्या पसंतीच्या अनुभवावरून त्यांना सेवा सुविधा पुरवण्यावर स्थानिकांचा भर राहिला असल्याचेही चित्र आहे.

मासळीची साठवणूक

सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक आतुर आहेत. त्यासाठी निवास व्यवस्थेचे आगावू आरक्षण करण्यासाठीची चाचपणी सुरू असल्याचे दिसते. पर्यटकांकडून हॉटेल व्यवसायायिकांना बऱ्यापैकी प्रतिसाद आहे. वर्षअखेरीच्या पार्श्‍वभुमीवर मासळीचे कडाडणारे दर तसेच उपलब्धतेची कमतरता राहण्याच्या शक्‍यतेने काहींनी आतापासूनच उच्चप्रतीची मासळी साठवणूक सुरू 
केली आहे.

उलाढालीत वाढ शक्‍य

तालुक्‍यातील किल्ले विजयदुर्ग, रामेश्‍वर मंदिर, विमलेश्‍वर मंदिर, कुणकेश्‍वर मंदिर पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होते. येथील समुद्रकिनारी आतापासूनच गर्दी होताना दिसत आहे. पुढील आठवड्यात पर्यटकांच्या संख्येत वाढ होईल. यासाठी काहींनी आगावू निवासाची व्यवस्था आरक्षित केल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे स्थानिक उलाढालीत वाढ होण्याचे संकेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com