देवरुखात २९ कुटुंबे एकाच वेळी करणार देवीची पूजा

प्रमोद हर्डीकर
Saturday, 17 October 2020

देवरुख मधील गुजराती बांधवांच्या नवदुर्गा उत्सवात ३६ वर्षांनी पडला खंड आहे

साडवली : संगमेश्वर तालुक्यात गुजराती बांधवांनी १९८४ साली श्री नवदुर्गा उत्सव सुरु करुन नवरात्रौत्सवाची खरी ओळख तालुकावासियांना करुन दिली. शारदा सॉमिलच्या पटांगणात रंगणारा रास गरबा दांडीया आज ३६ वर्षांनी कोरोनामुळे थांबला. 
श्री नवदुर्गेची विविध रुपातील देखणी मूर्ती या उत्सवाचे वैशिष्ट्य बनले होते. 

हेही वाचा - कोकणात दीडशे हेक्टरपेक्षा अधिक भातशेतीचे नुकसान ; कृषी विभागातर्फे पंचनामे सुरु -

यंदा मात्र कोरोनामुळे महिनाभरापुर्वीच हा उत्सव साजरा न करण्याचे बैठक घेवून गुजराती बांधवांनी शासन निर्णयाला मान्यता दिली. तालुक्यात आत्ता २९ कुटुंबे आहेत. या कुटुंबांनी नवरात्रौत्सवात रात्री ८ वाजता एकाच वेळी श्री नवदुर्गेची पुजा आरती करण्याचा निर्णय घेतला आहे. सलग नऊ दिवस हा उपक्रम केला जाणार आहे. मूर्ती आणुन, पुजा करून गर्दी करण्यापेक्षा घरीच पुजन करण्याचे गुजराती बांधवांनी ठरवले आहे. या निर्णयाचे तालुक्यात स्वागत करण्यात आले.

हेही वाचा -  मिठाई खाताय ? ‘बेस्ट बिफोर पाहताय का ?

गुजराती बांधवांचा तालबद्ध, लयबद्ध होणारा दांडीया रास गरबा गेली ३६ वर्ष या परिसरात साजरा केला जातो. तालुकावासियांनी या उत्सवाचा मनमुराद आनंद लुटला येतो. मात्र यंदा कोरोनामुळे या सगळ्या प्रथा, परंपरा, रूढी थोड्या बाजुला ठेवाल्या आहेत. घरच्या घरीच या सर्व परंपरा तेवढ्याच जोमाने सुरु ठेवल्या जाणार आहेत. अगदी सोप्या मात्र तितक्याच भक्ती भावाने साजरा केला जाणार आहे.  

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tradition of durga festival of gujarati family stopped caused by corona decision take durga puja at home in devrukh