म्हणून दसऱ्याला घटावर होते अठरा धान्यांची पेरणी

tradition of navratri festival is ghatasthapana in village area increases the grain of home in ratnagiri
tradition of navratri festival is ghatasthapana in village area increases the grain of home in ratnagiri

मंडणगड : कोकणात नवरात्रात घटस्थापनेच्या दिवशी घटावर विविध प्रकारच्या धान्यांची पेरणी करून दसऱ्याच्या दिवशी त्या धान्यांचे वाढलेले अंकुर म्हणजे रो उपटून देवाला वाहण्याची पिढ्यान्‌पिढ्याची अठरा धान्ये पेरण्याची भक्तिमय प्रथा मंडणगड तालुक्‍यातील ग्रामीण भागात आजही जोपासली जाते. गावोगावी कुलस्वामिनीचे घट बसविले असून नऊ दिवस त्याची पूजाअर्चा करणार आहे. नवरात्रीचे नऊ दिवस अखंडदीप तेवत 
ठेवला जातो.

प्रत्येक घराण्यांची परंपरा, रुढी आणि प्रथा यानुसारच हा भक्तिमय उत्सव साजरा होत आहे. तसेच दसऱ्याला शेतकरी व कारागीर आपापली अवजारे व हत्यारे यांची पूजा करतात. प्रत्येक घराण्याचे एक विशिष्ट कुलदैवत असते. कुलदैवत याचा अर्थ कुलस्वामिनी. कुलदेवता ही घराण्याच्या मूळ पुरुषाने स्वीकारलेली असल्याने घरातील अन्य सदस्यांना ती स्वीकारावीच लागते. त्यामुळे एकाच कुटुंबातील निरनिराळ्या घटकांची इष्टदेवता निरनिराळी असली तरी त्या कुटुंबाची किंवा त्या घराण्याची कुलदेवता मात्र एकच असते.

श्रद्धा, भावना, परंपरा, आस्था, निष्ठा इत्यादींमुळे आपल्या घराण्याच्या मूळ पुरुषाने स्वीकारलेली कुलदेवता स्वीकारण्यात येते. नवरात्रात घटस्थापना हा मुख्य विधी असतो. देव्हाऱ्यातील देवींच्या मूर्ती स्वच्छ पाण्यात घासून धुवून घेण्यात आल्या. त्यांना पुन्हा स्थानापन्न करून त्यांची यथोचित पूजा केली. समोर एक मातीची वेदी (ओटा) करून त्यावर घटस्थापना करताना. त्याभोवती चवळी, पावटे, उडीद, तीळ, नाचणी, भात, वरी, जोंधळे अशी अठरा धान्ये पेरण्यात आली. नवरात्र उठेपर्यंत दररोज तिची षोडशोपचारे पूजा केली जात आहे. घटावर रोज एक याप्रमाणे झेंडूच्या किंवा रानफुलांच्या माळा सोडल्या जात आहेत.

घरे धनधान्यांनी भरावी

घटावर अठरा धान्य पेरण्याच्या प्रथेतून मानव आणि निसर्गाचे परस्परानुरूप असलेले संबंध अधोरेखित होतात. शेतात सर्वत्र धान्य तयार झाले असून ते घरी आणण्याची लगबग सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर ही घटस्थापना महत्वाची मानली जाते. शेतकऱ्यांची घरे धनधान्यांनी भरावी, अशी प्रार्थना केली जाते.

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com