

Traffic Jams and Poor Roads Harm Tourism in Raigad
Sakal
पाली : डोळ्यांचे पारणे फेडणारे निसर्गसौंदर्य, तब्बल 240 किमी लांबीचा विस्तीर्ण समुद्रकिनारा, माथेरान सारखे थंड हवेचे ठिकाण ऐतिहासिक आणि धार्मिक वारसे व स्थळे लाभलेला रायगड जिल्हा पर्यटनासाठी नंदनवन आहे. त्यामुळे महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपुर्ण भारतातील पर्यटक, इतिहासप्रेमी, पर्यावरण अभ्यासक व भाविक जिल्ह्यात दाखल होत असतात. उन्हाळी, दिवाळी व नाताळच्या सुट्ट्यांमध्ये तर पुणे-मुंबईसह महाराष्ट्रातील निरनिराळ्या ठिकाणचे पर्यटक रायगड जिल्ह्यातील पर्यटन, एैतिहासीक व धार्मिक स्थळांवर गर्दी करतात.