खोपोली पाली मार्गावर वाहतूक कोंडी; चाकरमान्यांची गैरसोय

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 8 September 2019

रायगड - गौरी गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर कोकणात गेलेले चाकरमानी आज परतीच्या प्रवास करत आहेत. यामुळे मुंबई - गोवासह पाली खोपोली महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. या मार्गावर वाहतूक संथगतीने सुरू असून पाली - खोपोली दरम्यान जांभुळपाडा - परळी येथे तीन ते चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. 

जांभुळपाडा ते परळी दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. वाहतूक कोडी झालेली असली तरी वाहने हळू पुढे सरकत आहेत. महामार्ग पोलीस वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. पाली खोपोली महामार्गावर पर्यायी दुसरा मार्ग नसल्याने वाहतुक कोंडी होत आहे, असे मत व्यक्त केले जात आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Traffic jam on Khopoli Pali Road in Raigad