कोकणात नद्या दुथडी भरून वाहू लागल्या ; पाखाडीचा भराव खचला

Traffic was disrupted due to flooding in ratnagiri pawas
Traffic was disrupted due to flooding in ratnagiri pawas
Updated on

पावस (सिंधुदुर्ग) : पावस पंचक्रोशीत मंगळवारपासून पडणार्‍या वादळी पावसामुळे अनेक सखल भागात पाणी घुसले असून स्वामीमार्गे नाखरे मार्गावर पाणी घुसल्याने वाहतूक वारंवार ठप्प होत आहे.


अरबी समुद्रात असलेले चक्रीवादळ व मान्सून पावसाने सुरवात केल्यामुळे परिसरात वादळी पावसाने दणका दिल्याने पावसची भाग्यरेषा असलेली गौतमी नदी दुथडी भरून वाहत असल्यामुळे नदीकाठच्या अनेक भागात पुराचे पाणी घुसल्याने जगजीवन विस्कळित झाले आहे. नवलादेवी मंदिर परिसर, नंदाची बाग, समाधी मंदिर रस्ता आदी भागात पावसाचे पाणी घुसल्यामुळे त्या भागातील वाहतूक वारंवार बंद पडत होती.

पावस महाविष्णू मंदिराकडे जाणार्‍या पाखाडीचा भराव पहिल्याच पावसात वाहून गेल्याने पादचार्‍यांची अडचण निर्माण झाली आहे. जुलै 2019 मध्ये पडलेल्या दमदार पावसामध्ये महाविष्णू पर्‍याला आलेल्या पुरामुळे पाखाडीचा काही भाग पुराच्या पाण्याने ढासळला होता. त्यामुळे तिथून जाणारी दुचाकी वाहने व ग्रामस्थ यांना जाण्यासाठी अडचण निर्माण झाली होती.

शिमगोत्सवात पालखीची पायवाट तिथून असल्यामुळे ढासळलेल्या पाखाडीमुळे अडचण निर्माण झाली होती. ग्रामपंचायतीने ही अडचण दूर करण्यासाठी त्या ठिकाणी भराव टाकला होता. त्यामुळे जाणार्‍यांची तात्पुरती सोय झाली होती; मात्र त्यानंतर लॉकडाऊनमुळे बांधकाम होऊ न शकल्याने पावसाच्या पहिल्या दणक्याने भराव वाहून गेल्यामुळे पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या मार्गावरून जाताना ग्रामस्थांना कसरत करावी लागणार आहे. उर्वरित पाखाडी सतत पडणार्‍या पावसामुळे वाहून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात या पाखाडीचा रस्ता बंद होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com