
पाली : माणगाव व इंदापूर येथे वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीचा फटका विधी विदयार्थ्यांना बसला आहे. मुंबई विद्यापीठातर्फे होणाऱ्या एलएलबी तीन वर्षं कोर्सच्या प्रथम वर्षं व द्वितीय वर्षाच्या परीक्षा बुधवारी (ता. 7) सुरु झाल्या आहेत. माणगाव शहरात दोन विधी महाविद्यालय असून रायगड जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील विद्यार्थी या ठिकाणी विधी शिक्षण घेत आहेत. मात्र माणगाव व इंदापूर येथे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा फटका अनेक विद्यार्थ्यांना बसला. त्यांना परीक्षेस पोहचण्यास उशीर होत आहे. परिणामी त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.