महामार्गावर कुडाळ-पणदूर दरम्यान वाहतूक संथ गतीने

अनंत पाताडे
शुक्रवार, 14 जून 2019

कुडाळ -  कोकणात मुसळधार पाऊस सुरू असल्याने मुंबई- गोवा महामार्गावर वाहतूक संथ गतीने सुरू आहे. कुडाळ पणदूर येथे महामार्गावर कंटेनर मातीत फसल्याने तब्बल एकतास वाहतूक कोंडी झाली. 

कुडाळ -  कोकणात मुसळधार पाऊस सुरू असल्याने मुंबई- गोवा महामार्गावर वाहतूक संथ गतीने सुरू आहे. कुडाळ पणदूर दरम्यान महामार्गावर कंटेनर मातीत फसल्याने तब्बल एकतास वाहतूक कोंडी झाली. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की,  महामार्गावर पावसामुळे चिखल झाला आहे. यातून वाहने चालवण्यात चालकांना अडचणी येत आहेत. त्यातच कुडाळ - पणदूर दरम्यान महामार्गावर कंटेनर मातीत फसल्यामूळे वाहतूक कोंडी झाली. पणदूर ते हुमरमळा दरम्यान गाड्यांच्या रांगाच रांगा लागलेल्या पहायला मिळत आहे.  क्रेनच्या साह्याने कंटेनर बाहेर काढण्यात आला आहे. पण मार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरू आहे.

कुडाळ पोलीस प्रशासनाची वाहतूक नियंत्रण करण्यात धावपळ उडाली आहे  महामार्ग प्राधिकरणच्या निकृष्ट कामामुळे गाड्या फसल्याने ही समस्या निर्माण होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Trafic jam near Kudal - Pandur on Mumbai Goa highway