
-अमित गवळे
पाली: मंगळूरकडे जाणाऱ्या मत्स्यगंधा एक्सप्रेसमधून पडून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी (ता.13) सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास कोलाड रेल्वे स्टेशन ते रोहा रेल्वे स्टेशनच्या दरम्यान गोवे गावाच्या हद्दीत, रेल्वे पोल क्र. 7/35 पटरी जवळ घडली. रात्री या महिलेचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला.