रत्नागिरी : शहरातील एका तरुणाला प्राप्तिकर विभागाने (Income Tax Department) तब्बल १७८ कोटी रुपयांच्या व्यवहारप्रकरणी नोटीस बजावली आहे. या नोटिशीमुळे संबंधित तरुण हादरून गेला आहे. योगेश हळदवणेकर असे त्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या पॅन आणि आधार कार्डचा (Aadhar Card) गैरवापर करून दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) दोन कंपन्या स्थापन केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.