ओरोस येथे घरावर झाड कोसळले

ओरोस येथे घरावर झाड कोसळले
Updated on

कुडाळ - ओरोस महापुरूष मंदिर येथील जयश्री परब यांच्या राहत्या घरावर पिंपळाचे अवाढव्य झाड कोसळले. यात जयश्री परब यांनी दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना काल (ता.13) रात्री उशिरा घडली.

तालुक्‍यात मुसळधार पावसाला सुरवात झाली आहे. यातच सोसाट्याचा वारा वाहत आहे. याचा फटका ओरोस महापुरूष मंदिर येथील जयश्री परब यांना बसला. काल रात्री उशिरा झालेल्या वादळी पावसात त्यांच्या राहत्या घरावर पिंपळाचे अवाढव्य झाड कोसळले. घराचे पूर्णपणे नुकसान झाले. अचानक घरावर पिंपळाचे झाड कोसळल्याने घरातील माणसे घाबरलेल्या अवस्थेत बाहेर आली.

भला मोठा पिंपळ घरावर कोसळल्याने ते घाबरले. प्रशांत परब आणि त्याची आई जयश्री परब घरात राहत होती. प्रशांतच्या आईला यात दुखापत झाल्याने त्यांना ओरोस येथील जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. यात घराचे मात्र पुर्णतः नुकसान झाले. घरची परिस्थिती अतिशय हलाखीची असल्याने त्यांना मदतीची गरज आहे. पावसाळ्यात पिंपळ कोसळला असल्याने त्यांचे रहाण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Ratnagiri food safety raid on fake paneer
Mumbai Goa Highway landslide update
MNS threatens protest in Sudhagad Taluka against the installation of smart meters by Mahavitaran
ANS (Andhashraddha Nirmulan Samiti) and women's organizations in Pen organize 'Vatsavitri te Vatdharitri' campaign for tree plantation
Marathi News Esakal
www.esakal.com