

Massive Infrastructure Damage: Roofs Blown Off, Trees Uprooted, and Power Outages
Sakal
पाली : पाली शहरासह सुधागड तालुक्याला शनिवारी (ता. ९) दुपारी विजांचा कडकडात व ढगांच्या गडगडाटासह आलेल्या अवकाळी मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. दुपारच्या सुमारास अचानक आलेल्या या वादळी पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. या नैसर्गिक संकटामुळे शहरात अनेक झाडांची पडझड झाली. तसेच विजेचे खांब वाकले विद्युत तारा तुटल्या. घरांचे व महाविद्यालयाचे पत्रे उडाले व इतरही अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे.