भाट्ये येथे ट्रक उलटून अपघात ; एकजण ट्रक खाली अडकला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

ट्रकमध्ये एकूण तीनजण होते यापैकी क्लिनर ने ताबा सुटतात उडी टाकली तर ड्रायव्हर आणि त्याचा एक सोबती ट्रक सोबत खाली कोसळले.

रत्नागिरी - भाट्ये दर्गा स्टॉप जवळील अवघड वळणावर मालवाहू ट्रक उलटून अपघात झाला. चालकाचा ताबा सुटून ट्रक सुमारे 250 फूट खोल दरीत कोसळला. हा ट्रक फिनोलेक्स कंपनीतून माल घेऊन जात असताना ही घटना घडली.

ट्रकमध्ये एकूण तीनजण होते यापैकी क्लिनर ने ताबा सुटतात उडी टाकली तर ड्रायव्हर आणि त्याचा एक सोबती ट्रक सोबत खाली कोसळले. ड्रायव्हरला किरकोळ दुखापत झाली असून त्याच्या सोबत केबिनमध्ये असणारा एकजण मात्र ट्रक केबिनखाली अडकला आहे. आता क्रेन आणून या अडकून पडलेल्या व्यक्तीला काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Truck accident because of overturns at Bhatye ratnagiri

टॅग्स
टॉपिकस