esakal | दिलासादायक ! अडीच हजार टन तांदूळ मालगाडीने रत्नागिरीत 
sakal

बोलून बातमी शोधा

Two And  Half Thousand Tonnes Of Rice By Train

भारतीय अन्न महामंडळाकडून पाठविण्यात आलेला तांदळाचा साठा कोकण रेल्वेच्या मालगाडीने रत्नागिरी रेल्वे स्थानकात दाखल झाला आहे. 42 डब्यांची मालगाडी भटू येथून तीन दिवसांचा प्रवास करत बुधवारी (ता. 15) रत्नागिरीत आली.

दिलासादायक ! अडीच हजार टन तांदूळ मालगाडीने रत्नागिरीत 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी/लांजा - भारतीय अन्न महामंडळाकडून पाठविण्यात आलेला तांदळाचा साठा कोकण रेल्वेच्या मालगाडीने रत्नागिरी रेल्वे स्थानकात दाखल झाला आहे. 42 डब्यांची मालगाडी भटू येथून तीन दिवसांचा प्रवास करत बुधवारी (ता. 15) रत्नागिरीत आली. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे अन्न-धान्याचा तुटवडा उद्‌भवू नये यासाठी आवश्‍यक साठा केंद्र शासनाकडून पाठविण्यात येत आहे. हा तांदूळ भारतीय खाद्य निगमच्या रत्नागिरी गोदामात ठेवण्यात येणार आहे. 

केंद्र शासनाने दोन महिन्यांचे धान्य रास्त दराच्या धान्य दुकानातून पुरवठा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. गावातल्या गावात ही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र व राज्य सरकार प्रयत्नशील आहेत. त्यासाठी लागणाऱ्या धान्याची मागणी जिल्ह्यांकडून मागवण्यात आली होती. त्यानुसार भारतीय अन्न महामंडळाकडून राज्यांना आवश्‍यक साठा पुरवठा केला जात आहे. लॉकडाऊनमुळे संपूर्ण दळणवळण व्यवस्था बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे माल वाहतुकीसाठी कोकण रेल्वे प्रशासनाचे सहकार्य घेण्यात येत असून मालगाड्यांद्वारे वाहतूक सुरू आहे.

कोकण रेल्वेच्या मालगाडीने धान्यसाठा आणण्यात येतो. तांदूळ घेऊन मालगाडी रत्नागिरी स्थानकात दाखल झाली. त्याला 42 डबे असून त्यात 2600 टन तांदूळाचा पुरवठा विभागाला उपलब्ध झाला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालगाडीने धान्यसाठा सुरळीतपणे जिल्ह्याला उपलब्ध झाला आहे. भारतीय खाद्य निगमच्या परवानगी दिलेल्या माथाडी कामगार, कर्मचारी आणि कोकण रेल्वे कर्मचारी यांची प्राथमिक तपासणी केली आहे. हे धान्य रत्नागिरी एमआयडीसीसह भोके येथील गोदामामध्ये साठा करून ठेवले आहे. जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार धान्य वितरण सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी तांदळाची मालगाडी झाराप येथे आली होती. येत्या काही दिवसात गहू घेऊन एक गाडी रत्नागिरीत येणार आहे. 

loading image