या पथकाला कणकवली शहरात दोन बांगलादेशी (Bangladeshi) महिला वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली होती. शहरातील काही लॉजवर छापा टाकल्यानंतर या महिला रेल्वे स्थानकात गेल्याचे समजले.
कणकवली : कणकवली रेल्वे स्थानकातून (Railway Station) बांगलादेशातील (Bangladesh) दोन महिलांना अटक करण्यात आली आहे. पहाटे चारच्या सुमारास दहशतवाद विरोधी पथकाच्या सिंधुदुर्ग विभागाने (Sindhudurg Division) ही कारवाई केली. या दोन्ही महिलांकडून (Women) अधिक माहिती घेतली जात आहे. आज (ता.१६) त्यांना येथील न्यायालयात हजर केले जाणार आहे.