सावंतवाडीतून आईसह दोन मुले बेपत्ता

भूषण आरोसकर
Saturday, 24 October 2020

पती हनुमंत गंगाराम वाघमारे यांनी त्यांची घरी परत येण्याची वाट पाहिली; मात्र पाच दिवसांपासून त्या घरी न परतल्याने नातेवाईकांकडे शोध चौकशी केली; मात्र काही निष्पन्न झाले नाही.

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - तुळजापूर येथे देवीच्या दर्शनाला जाते, असे सांगून येथील आईसह दोन मुले बेपत्ता असल्याची नोंद येथील पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी, की रेणुका हनुमंत वाघमारे (वय 42, रा. सबनीसवाडा) या 19 रोजी सकाळी 10 वाजता मुलगा केशव हनुमंत वाघमारे (वय 12) आणि मुलगी वैष्णवी हनुमंत वाघमारे या दोन्ही मुलांना घेऊन तुळजापूर येथील देवीच्या दर्शनाला जाते, असे सांगून घराबाहेर पडल्या. त्यांचे पती हनुमंत गंगाराम वाघमारे यांनी त्यांची घरी परत येण्याची वाट पाहिली; मात्र पाच दिवसांपासून त्या घरी न परतल्याने नातेवाईकांकडे शोध चौकशी केली; मात्र काही निष्पन्न झाले नाही.

अखेर आज येथील पोलिस ठाण्यात दाखल होत बेपत्ता असल्याची फिर्याद दिली आहे. याबाबत बेपत्ता असल्याची नोंद केली असून तपास पोलीस कर्मचारी प्रसाद कदम हे करत आहेत. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two children along with mother go missing from Sawantwadi