सावधान ! सावंतवाडी तालुक्‍यात आणखी दोघे पॉझिटिव्ह 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 25 August 2020

गेल्या काही दिवसांपासून तालुक्‍यात मोठ्या संख्येने कोणाचे रुग्ण सापडत होते; मात्र आज दोन रुग्ण सापडल्याने वाढत्या रुग्णसंख्येला थोडाफार आळा बसला आहे. 

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - तालुक्‍यात आणखीन दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यशराज हॉस्पिटलच्या ओपीडीमध्ये तपासणीसाठी आलेल्या एका रुग्णाचा रॅपिड टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह निघाला आहे. तळवडे येथील एक अन्य उपचारासाठी ओरोस येथे गेलेल्या रुग्णालाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून तालुक्‍यात मोठ्या संख्येने कोणाचे रुग्ण सापडत होते; मात्र आज दोन रुग्ण सापडल्याने वाढत्या रुग्णसंख्येला थोडाफार आळा बसला आहे. 

येथील यशराज हॉस्पिटलमध्ये ओपीडीमध्ये रुग्ण उपचारासाठी दाखल झाला होता. यानंतर त्याचा स्वॅब रिपोर्ट आरोग्य विभागाकडून घेण्यात आला होता. त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने आज संपूर्ण यशराज हॉस्पिटल आणि परिसर हा फवारणी करून सॅनिटाईझ करण्यात आला. काही दिवसापूर्वी तळवडे येथील कॅन्सरच्या आजार असलेला रुग्ण निरवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील उपचारासाठी आला होता. तो ओरोस येथे गेला असता तेथे त्याची स्वॅब टेस्ट घेण्यात आली. यावेळी त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

काल उशिरा येथील आरोग्य विभागाला याबाबत देण्यात आले. गेल्या काही दिवसात तालुक्‍यामध्ये आणि शहरांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती; मात्र आज येथील तालुक्‍यात अवघे दोन रुग्ण सापडल्याने गेल्या काही दिवसातील चढता आलेख घसरला आहे. तरीही नागरिकांनी योग्य ती दक्षता घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. नुकतीच तालुक्‍यातील रुग्णांची संख्यने 150 चा आकडा पार केला असून आता 200 चा आकडा पार करण्याच्या दिशेने पूर्ण रुग्णांची वाटचाल सुरू आहे. ही बाब मात्र चिंताजनक आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two Corona Patient Found Sawantwadi Taluka