कोकण : लोटेतील आगीत दोन कामगार भाजले

two employee injured in lote MIDC by fire in khed ratnagiri
two employee injured in lote MIDC by fire in khed ratnagiri
Updated on: 

खेड (रत्नागिरी) : लोटे एमआयडीसीतील सुप्रिया केमिकल कंपनीत (सोमवार) सकाळी अचानक साडेअकरा वाजता स्फोट होऊन आग लागली. यात दोन कामगार भाजले. एकाला उपचारानंतर सोडून देण्यात आले, तर आणखी दोघे गंभीर आहे. अंकुश बडदे, रोहित यादव अशी गंभीर असलेल्या कामगारांची नावे आहेत. अंकीत वर्मा या कामगारावर चिपळूणच्या एसएमएस हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार करून त्याला सोडून देण्यात आले. गंभीर कामगारांना पुढील उपचारासाठी एसएमएस हॉस्पिटलला हलवण्यात आले. 

या कंपनीत रक्तदाबावरील औषधी गोळ्या तयार केल्या जातात. सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास कंपनीत त्या गोळ्या तयार करण्यासाठी जी पावडर उपयोगात आणली जाते, ती पावडर सुकवण्यासाठी जे सॉल्व्हंट तयार करण्यात येते, त्याची उष्णता वाढल्याने स्पार्क होऊन आग लागली, अशी माहिती खेडच्या पोलिस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी दिली. आग लागताच धूर बाहेर जाण्यासाठी काचेच्या खिडक्‍या फोडण्यात आल्या. त्या वेळी फोडलेली काच एका कामगाराच्या मानेवर पडली. त्यात तो किरकोळ जखमी झाला, अशी माहितीही त्यांनी दिली. मोठ्या प्रमाणात धूर येऊ लागला. त्यानंतर कंपनीतील कामगारांमध्ये एकच धावपळ सुरू झाली. 

कंपनीचे मोठे नुकसान

आगीची माहिती मिळताच लोटे अग्निशमन केंद्राचे प्रमुख आनंद परब यांनी आग विझवण्यासाठी दोन वाहने तातडीने घटनास्थळावर पाठवली. अर्ध्या तासानंतर आगीवर नियत्रंण मिळवण्यात आले. आगीत कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pali Ramdas Athawale Constitution Statement RPI To Connect All Communities With Its Social Justice And Equality Agenda
Jaigad-Chiplun-Satara Expressway
Rajapur Kodavali new dam seven times water storage
Mukhyamantri Vayoshri Yojana
Marathi News Esakal
www.esakal.com