शिवकालीन पायवाटेसह या मार्गावरील ऐतिहासिक ठेव्याचे जतन आणि संवर्धन होण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.
राजापूर : तालुक्यातील रायपाटण येथील श्री मनोहर हरी खापणे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (Rashtriya Seva Yojana) विभागाच्या विद्यार्थ्यांनी फारशी रहदारी नसलेल्या येरडव ते अणुस्कुरा या सुमारे तीन-चार किमी लांबीच्या ऐतिहासिक शिवकालीन पायवाटेची श्रमदानाने स्वच्छता केली.