ही धडक एवढी जोरदार होती, की यामध्ये स्विफ्टच्या चालकाच्या बाजूचा भाग बसमध्ये शिरून पूर्ण चेपला गेला आहे.
पाली : ताम्हिणी घाटात रायगड जिल्ह्याच्या हद्दीत रेस्ट हाऊसच्या अलीकडे आज (ता. 4) दुपारी एक-दीडच्या सुमारास एसटी बस आणि कारचा भीषण अपघात (Tamhini Ghat Accident) झाला. या अपघातात कारमधील दोघांचा मृत्यू झाला असून तिघेजण जखमी आहेत.