अन् सुटकेचा नि:श्‍वास टाकत त्यांनी पुन्हा घेतली झेप

राजेश शेळके
Thursday, 6 August 2020

कासव प्रेमींचा पुढाकार; सुटका होता झेपावले समुद्रात

रत्नागिरी : गणपतीपुळे समुद्र किनारी आणखी दोन ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांना स्थानिकांनी जीवदान दिले. मच्छीमारांच्या झाळ्यात अडकून पडल्याने ते अखेरची घटका मोजत होते. या दरम्यान स्थानिकांच्या निदर्शनास पडल्याने त्यांनी दोन्ही कासवांची जाळ्यातून सुटका केली. किनार्‍यावर सोडल्यानंतर ते सुटकेचा निश्‍वःस टाकत दोन्ही कासव समुद्रात झेपावली.

हेही वाचा- रत्नागिरीत भक्तीला नाही तोड ; पुराच्या वेढ्यातही नामगजर -

समुद्री कासवांच्या संवर्धनासाठी  समुद्र किनारे ठिकठिकाणी संरक्षित केली आहेत. अनेक ठिकाणी कासव अंडी घालण्यासाठी किनार्‍यावर येतात. वन विभाग आणि कासवप्रेमींनी त्यांची घरटी संरक्षित केली आहेत.  विविध प्रकारच्या या प्रजाती किनार्‍यावर सापडतात. काही दिवसांपूर्वी समुद्र किनार्‍यावर मृत कासवही सापडत होते. हा विषय देखील चिंताजनक होता. आता नव्याने मासेमारी हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे अनेकवेळा जाळ्यात अडकलेली कासव किनार्‍यावर सुटकेसाठी धडपडत असल्याचे दिसत आहेत.

हेही वाचा- दरड कोसळली ; कोंकण रेल्वे मार्गावरील या पाच गाड्या मिरजमार्गे वळवल्या -

ते  दोघे अडकले पण यांच्यामुळे वाचला जीव       

काही दिवसांपूर्वी गणपतीपुळे किनार्‍यावर एका कासावला तेथील स्थानिकांनी जीवदान दिले होते. काल गणपतीपुळे तंबू निवास येथे दोन कासव मच्छीमार्‍यांच्या जाळ्यात अडकून किनार्‍यावर अखेरची घटका मोजत असताना दिसली. तेथील राज देवरूखकर, संजय रामाणी, शुभम चव्हाण (एमटीडीसी कर्मचारी), सिक्युरिटी गार्ड आदींनी पुढाकार घेऊन या कासवांची जाळ्यातून सुटका केली. त्यानंतर त्यांना समुद्र किनार्‍यावर सोडल्यानंतर मोठ्या आत्मविश्‍वासाने ती पाण्यात झेपावली.

संपादन - अर्चना बनगे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two more Olive Ridley turtles Locals rescued from fishing net Ganpatipule beach