ब्रेकिंग - रत्नागिरीत आज पुन्हा सापडला कोरोनाचा दुसरा रुग्ण...

Two new corona patients found in Ratnagiri
Two new corona patients found in Ratnagiri
Updated on: 

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण पाठोपाठ आज संगमेश्वर येथे  कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला त्यामुळे जिल्ह्यात खळबळ माजली आहे. हे रुग्ण जे जे हॉस्पिटल व अन्य ठिकाणाहून  येथे आले आहेत.जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी ही  माहिती दिली.

संगमेश्वर इथंही एक रुग्ण असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.  हा रुग्ण ठाण्यातून आला आहे. प्रशासनाने या रुग्णांना वेगळं ठेवले आहे. चिपळूण मध्येही 1 रुग्ण सापडला आहे. त्यांच्या संपर्कातील सर्वांचे स्वँब तपासणीसाठी घेतले आहेत. दोन्ही तालुक्यातील दोन्ही रुग्णाच्या  परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.आलेल्या परिस्थितीचास सामना करूया.  नागरिकांनी घाबरुन न जाता आवश्यक ती दक्षता घ्यावी ,असं आवाहन जिल्हाधिकारी यांनी केलं आहे.

चिपळूण मधील एका व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळून आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिश्रा यांनी पत्रकारांना दिली दिली आहे. शुक्रवारी रात्री त्याचे रिपोर्ट आले असून त्याने मुंबई जेजे हॉस्पिटल येथून प्रवास करून आल्याची माहितीही दिली. त्यामुळे रेड झोन मधून प्रवास करून जिल्ह्यात अनेकजण येत असून भविष्यात रुग्ण संख्या वाढू नये यासाठी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतल्याचे त्यांनी सांगितले.ही माहिती सोशल मीडिया वरून वाऱ्यासारखी पसरल्यानंतर तालुक्यात एकच खळबळ उडाली संबंधित रुग्ण हा कोणत्या भागाचा आहे याची माहिती घेण्याचे काम नागरिकांनी सुरू केले पुणे तहसील कार्यालयात तर दोन्ही प्रांताधिकारी कार्यालयात फोन करून याबाबतची माहिती ती घेण्याचा प्रयत्न केला मात्र येथील कार्यालयाकडे याबाबतची माहिती नसल्यामुळे नागरिक गोंधळून गेले आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Mukhyamantri Vayoshri Yojana
Sindhudurg Ganesh Visarjan
Vengurla Gold Jewellery Theft
kokan railway
Marathi News Esakal
www.esakal.com