चोर समजून तरुणालाच केली बेदम मारहाण

राजेश शेळके
Wednesday, 18 November 2020

याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात संशयितां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रत्नागिरी : चोरी केल्याच्या संशयातुन मिरकरवाडा येथे तरुणाला आधी हॉटेलमध्ये आणि नंतर दुकानाजवळ नेऊन बेदम मारहाण केली. तरुणाला बांधून कपडे काढून मारहाण करण्यात आली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात संशयितां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील मिरकरवाडा येथे नुकताच हा  प्रकार घडला. सलमान लियाकत कोतवडेकर (वय 25, रा. खडकमोहल्ला मिरकरवाडा) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. मारहाण करणाऱ्या इरफान अब्दुल लतीफ मस्तान (वय 42) आणि मोबिन अब्दुल लतीफ मस्तान (वय 35, रा. मधला मोहल्ला, मिरकरवाडा) अशी नावे आहेत. 

सलमान कोतवडेकर याने दिलेल्या तक्रारीनुसार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नऊ नोव्हेंबर रोजी सलमान कोतवडेकर हे हॉटेलमध्ये नाश्ता करीत असताना मोबिन मस्तान त्या ठिकाणी आले. भावाच्या दुकानात चोरी केल्याचा संशयातुन मारहाण करण्यास सुरुवात केली. त्या ठिकाणी इरफान मस्तान हे देखील आले. दोघांनी सलमान याला मारहाण केली. यानंतर दोघांनी सलमान याला ओढत दुकानजवळ नेत अंगावरील कपडे काढून हात पाठीमागे बांधून मारहाण केली. 

हेही वाचा - जावयांना आले सुगीचे दिवस -

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two people are attack from one youth for the theft accused in ratnagiri

Tags
टॉपिकस
Topic Tags: