ऐन दिवाळीत त्यांच्यावर काळाने घातला घाला ; दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू

राधेश लिंगायत
Saturday, 14 November 2020

परिसरातील ग्रामस्थांनी उर्रवरित इतरांना पाण्याबाहेर काढले.

हर्णे (रत्नागिरी) : ऐन दिवाळसणाच्या दिवशी हर्णे पाळंदे येथे दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला आहे. त्याने परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे. एक पर्यटकाचा मृतदेह लगेच सापडला तर दुसऱ्या पर्यटकाचा मृतदेह उशिरा सापडला.
आज सकाळी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. परिसरातील ग्रामस्थांनी उर्रवरित इतरांना पाण्याबाहेर काढले. दरम्यान घटनास्थळी पोलीस दाखल झाले. 

हेही वाचा - फायनान्स कंपन्यांकडून व्याजाच्या दबावाखाली कर्जदारांची होतीये लुट -

दिवाळीच्या निमित्ताने महाड येथील नवानगर सुतारआळी येथून गाडीचा चालक राकेश पवार (२२) रा. चांभारखिंड, दीपक नथुराम सुतार (१९), यश राकेश पवार (१७), प्रसन्नजित विदेश तांबे (१६), राहुल कान्हा पवार (१६), सोहम सकपाळ (१६), शिवम अनिल सोंडकर (१६), निखिल नंदकिशोर कोळंबेकर (१८) हे सर्व नवानगर सुतारआळी ८ पर्यटक सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पाळंदे किनाऱ्यावर फिरायला आले होते. 

घडलेली घटना अशी, अमावस्या असल्यामुळे समुद्राला मोठी भरती होती. आठजणापैकी गाडीचा चालक हा किनाऱ्यावरच थांबला होता आणि उर्वरित सातजण पोहायला गेले होते. पाळंदे समुद्रकिनारा तसा धोकादायक नाही, परंतु समोरच एक खड्डा असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले. हे सातही जण त्याच खड्ड्यात पोहत होते त्यामळे जोराची लाट आली, आणि सातजण बुडाले. त्यावेळी किनाऱ्यावर उभे असलेल्या चालकाने आरडाओरड केल्याने ग्रामस्थ अक्षय टेमकर, निखिल बोरकर,प्रवीण तवसाळकर यांनी त्यांना वाचवण्यासाठी धाव घेतली. दोरीच्या साहाय्याने त्याला वाचवलं याचवेळी पाळंदेमधील अभिजित भोंगले, अनिकेत बोरकर, सुदेश तवसाळकर, मीतेश मोरे, प्रीतम तवसाळकर, अनिल आरेकर, जहुर सुर्वे, राजेंद्र तवसाळकर ग्रामस्थांनी यावेळी धाव घेऊन मदत केली. यापैकी त्यांना पाचजणांना वाचवण्यात यश आले. 

हेही वाचा - चार गुंठे जागेसाठी महापालिका मोजणार आता 1 कोटी पेक्षा जास्त रक्कम - ​
 

दोन बेपत्ता असणाऱ्या पर्यटकांचा शोध सुरू केला. त्यावेळी दीपक पवार यांचा मृतदेह लगेचच वाहून आला. त्यानंतर खुप उशिरा बेपत्ता असलेल्या प्रसन्नजित तांबे याचा मृतदेह जवळपासच्या किनारीच मिळाला. गंभीर असणाऱ्या यशची प्रकृतीही स्थीर आहे. हे आठही जण महाविद्यालयीन वयाचे आहेत. दीपक सुतार हा वडिलांसोबत सुतारकाम करत होता. तर राकेश पवार हा ड्रायव्हर म्हणून खाजगी मालकाकडे काम करत होता. दिवाळीच्या सणात पर्यटकांचा मृत्यू झाल्याने या परिसरात नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two tourist dead in sea near harnai palande ratnagiri other are safe today in ratnagiri