Two Youths Brutally Assaulted in Harne Angry Citizens Stage Road Blockade
sakal
दापोली - दापोली तालुक्यातील हर्णे येथे दोन युवकांना झालेल्या बेदम मारहाणीच्या घटनेमुळे परिसरात बुधवारी तणावाचे वातावरण निर्माण झाले. चिन्मय गुरव व रघुवीर या दोन युवकांना ४० ते ५० जणांच्या समूहाने घेरून अमानुष मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला असून, या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.