पाताळगंगा नदी परिसरात पक्षांची रेलचेल

लक्ष्मण डुबे 
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

रसायनी (रायगड) - रसायनी परिसराला पाताळगंगा नदीचा विस्तीर्ण किनारा लाभला आहे. तसेच परिसराला लागुन कर्नाळा किल्ला आणि बाजुला घेरा माणिक गडाच्या डोंगर रांगा आहे. आणि परिसरात बारामहिने चालणारा शेती व्यावसाय आशा अनुकूल वातावरणामुळे परीसरात पक्षांची रेलचेल वाढली आहे. 

रसायनी (रायगड) - रसायनी परिसराला पाताळगंगा नदीचा विस्तीर्ण किनारा लाभला आहे. तसेच परिसराला लागुन कर्नाळा किल्ला आणि बाजुला घेरा माणिक गडाच्या डोंगर रांगा आहे. आणि परिसरात बारामहिने चालणारा शेती व्यावसाय आशा अनुकूल वातावरणामुळे परीसरात पक्षांची रेलचेल वाढली आहे. 

एचओसी काँलनीतील श्री साईबाबा मंदीरा जवळील व इतर ठिकाणचे मोठ मोठी झाड पक्षाचे वस्तीस्थान बनलं आहे. सायंकाळी तर सर्व पक्षांची जणु शाळा भरली की काय असे वाटते. ऋतु बदला अनुसार रसायनीत व जिल्ह्यात इतर ठिकाणी नोव्हेबर मध्ये पाहुणे आलेले सुंदर पक्षी सहा महिन्यासाठी वास्तव्या नंतर एप्रीलमध्ये परत जातात, असे पक्षीप्रेमी विनायक डुकरे यांनी सांगितले. 

परीसरात शेतक-यांना नदी, धरण आदि सिंचन साधनाचा आधार असल्याने बारामहिने शेती व्यावसाय सुरू असतो. नदी किनारी, शेतात, झाडांवर आदि ठिकाणी पक्ष्यांना भक्ष्य भेटते त्यामुळे पक्ष्यांना वास्तव्यासाठी अनुकूल वातावरण असल्याने देशी पक्ष्यांबरोबरच परदेशी पाहुण्यांचाही ओघ वाढला आहे. पक्ष्यांना परिसर नंदवन झाला आहे. कबूतर, कावळे, पाणकावळे, बगळे, पारव, चिमण्या, चिरक, सांळुख्या, पोपट, ठिपक्याचा पिंगळा आदी राज्यातील पक्षी परिसरात आढळतात. निलकंठ, स्वर्गीय नर्तक, हिरवे कबूतर, नाचण, कस्तूरी, हुदहुद, राखाडी धनेश, काळे शराटी, कृष्ण थिरथिरा, मोरकंठी लिटकुरी आदि स्थालांतरित पक्षी परिसरात दिसतात. 

निलकंठ पक्षी पश्चिम बंगालमध्ये आढळतात. नोव्हेबरमध्ये ते स्थलांतर करून परिसरात येतात. झाडाच्या ढोलीमध्ये घरटे बांधुन राहतात. प्रजननासाठी येथे हे पक्षी अनुकूल वातावरण असल्याने पिल्ल काढतात. आणि एप्रीलमध्ये पुन्हा परदेशी निघुन जातात. स्वर्गीय नर्तक हे पक्षी सुध्दामध्ये प्रदेश मधुन येतात, तसेच हळद्या पक्षी आता परिसरात बारा महिने दिसतात. 
- विनायक डुकरे, पक्षीप्रेमी, वासांबे मोहोपाडा 

Web Title: types birds Patalganga river area