जेट बोटीत सफारीचा आनंद आता गणपतीपुळेतही | Jet Boating in Ganpatipule | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Enjoy jet boating in Ganpatipule ratnagiri konkan

जेट बोटीत सफारीचा आनंद आता गणपतीपुळेतही

रत्नागिरी : गणपतीपुळे येथील समुद्र किनारी अतिवेगवान पॅसेंजर जेट बोट सुरू करण्यात येणार आहे. सुमारे दोन कोटी ५० लाख किमतीची ही बोट ऑक्टोबर २०२२ पर्यंत येणार आहे. त्यामुळे रत्नागिरीतील जल पर्यटन जागतिक नकाशावर येणार आहे. न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये पर्यटकांचे आकर्षण ठरणारी ही अतिवेगवान जेट बोट उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकारामुळे आणण्यात येत आहे. (Jet Boating in Ganpatipule)

कोकणातील पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी १६ कोटी ९२ लाखांच्या कामांसाठी प्रशासकीय मान्यता देण्याचे आदेश आज काढण्यात आले. यामध्ये गणपतीपुळे येथे येणाऱ्या जेट बोटचा समावेश असल्याची माहिती मपविमचे सल्लागार डॉ. सारंग कुलकर्णी यांनी दिली. यामुळे गणपतीपुळे जल पर्यटनाच्या माध्यमातून जगभरातून येणाऱ्या पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.

विशेष तपशील...

  • सुमारे १५ ते २० पॅसेंजर बसण्याची या बोटीची क्षमता

  • अर्ध्या तासात ही बोट गणपतीपुळे ते आरे वारे हे अंतर प्रचंड वेगात कापणार

  • ही बोट जेट इंजिनावर चालते व तासाला ८० किलोमीटर अंतर पार करते

  • अर्ध्या फूट खोलीतील पाण्यावर सुद्धा या वेगवान जलसफारीचा मिळणार आनंद

  • या जेट बोटीची १ तासाची व १५ मिनिटांची अशा दोन सफारी असणार

  • १५ मिनिटांची सफर ही गणपतीपुळे आसपासच असणार

Web Title: Uday Samant Aaditya Thackeray Enjoy Jet Boating In Ganpatipule Ratnagiri Konkan

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top