esakal | मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानांना `ही` नावे देण्याची विनंती 
sakal

बोलून बातमी शोधा

Uday Samant Demand Forts Name To Ministers Government Residence

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या विविध किल्ल्यांची नावे मंत्रालयासमोरील मंत्री आणि राज्यमंत्री यांना देण्यात आलेल्या शासकीय निवासस्थानांना देण्यात यावीत, असे विनंतीपत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आले आहे.

मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानांना `ही` नावे देण्याची विनंती 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - मंत्री, राज्यमंत्री यांना वाटप करण्यात आलेल्या शासकीय निवासस्थानांना राज्यातील विविध गडकिल्ल्यांची नावे देण्यात यावीत, अशी विनंती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या विविध किल्ल्यांची नावे मंत्रालयासमोरील मंत्री आणि राज्यमंत्री यांना देण्यात आलेल्या शासकीय निवासस्थानांना देण्यात यावीत, असे विनंतीपत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आले आहे.

मंत्री आणि राज्यमंत्री यांना वाटप केलेले शासकीय निवासस्थान क्रमांक आणि विनंती केलेल्या निवासस्थानांची नावे -  अ-3 सिंधुदुर्ग, अ-4 राजगड, अ-5 प्रतापगड, अ-6 रायगड, अ -9 तोरणा, ब -1 सिंहगड, ब -2 रत्नदूर्ग, ब -3 जंजिरा, ब - 4 पावनगड, ब -5 विजयदुर्ग, ब - 6 सिद्धगड, ब - 7 पन्हाळगड, क -1 आचलगड, क-2 ब्रह्मगिरी, क -3 पुरंदर, क - 4 शिवालय, क -5 अजिंक्‍यतारा, क-6 प्रचितगड, क - 7 जयगड, क -8 विशाळगड अशी नावे देण्यात यावीत, अशी विनंती करण्यात आली असल्याचेही सामंत यांनी सांगितले. 

loading image