रत्नागिरी जिल्हा बँकेवर सहकार पॅनेलचं वर्चस्व, राणेंच्या पॅनेलचा सुपडासाफ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mahavikas aghadi and bjp

रत्नागिरी जिल्हा बँकेवर सहकार पॅनेलचं वर्चस्व, राणेंच्या पॅनेलचा सुपडासाफ

मुंबई : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीकडे (ratnagiri district co operative bank election) सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर या बँकांचे निकाल आज घोषित झाले असून सहकार पॅनेलचे वर्चस्व असल्याचे सिद्ध झाले आहे. सहकार पॅनेलने मोठा विजय मिळवित निलेश राणे (Nilesh Rane) यांच्या पॅनेलचा सुपडासाफ केलाय.

हेही वाचा: जळगाव जिल्हा बँक निवडणुकीवर भाजपचा बहिष्कार; पाहा व्हिडीओ

रत्नागिरी जिल्ह्यात प्रतिष्ठेची समजली जाणारी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर, शिवसेना नेतेउदय सामंत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तानाजीराव चोरगे यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनलने निवडणूक लढविली होती. त्यांना निलेश राणे यांच्या समर्थकांचं आव्हान होतं. मात्र, उदय सामंत आणि चोरगे यांच्या पॅनलने रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर वर्चस्व निर्माण केलंय. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीत सहकार पॅनेलचे वर्चस्व अबाधित राहिले. 21 पैकी 14 उमेदवार बिनविरोध तर आज 7 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत 5 जागा सहकार पॅनलने राखल्या. तर विरोधी पॅनलचे अजित यशवंतराव दुग्ध मतदार संघातून आणि लांजा तालुका मतदारसंघातून भाजपा अध्यक्ष महेश उर्फ मुन्ना खामकर हे प्रथमच संचालक म्हणून निवडून आले आहेत.

जिल्हानिहाय मतदारसंघातील चारपैकी तीन जागा सहकार पॅनेलने जिंकल्या. यात दिनेश मोहिते, संजय रेडीज, सुरेश कांबळे विजयी झाले. यापैकी एक जागा विरोधी गटाच्या अजित यशवंतराव यांनी जिंकली. रत्नागिरी, गुहागर आणि लांजा या तीन तालुका मतदारसंघापैकी लांजा येथे सहकार पॅनेलचा पराभव झाला. येथे विरोधी उमेदवार महेश खामकर विजयी झाले.

loading image
go to top