राष्ट्रवादी-काँग्रेसबरोबर आघाडीचे संकेत : उदय सामंत

uday samant said in district central bank working gives tanajirao chorage in ratnagiri
uday samant said in district central bank working gives tanajirao chorage in ratnagiri

रत्नागिरी : जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचा कारभार डॉ. तानाजीराव चोरगे यांनी पुढील पाच वर्षे सांभाळावा. त्यांच्या पाठीशी शिवसेना कायम उभी राहील. हे माझे वैयक्‍तिक मत नव्हे तर शिवसेनेचे आहे. जिल्हा सहकारी बॅंकेत राजकारण करून त्या संस्थेची वाट लागण्यापेक्षा सकारात्मकतेने तिचे वलय चांगले ठेवण्यासाठी प्रयत्न करूया, असे सांगत राज्यात असलेली महाआघाडी बॅंकेच्या निवडणुकीत कायम ठेवण्याचा सुतोवाच उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केले.

आरडीसीसी बॅंकेने सुरू केलेल्या मोबाईल एटीएम व्हॅनच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला बॅंकेचे अध्यक्ष तानाजीराव चोरगे, जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, उपाध्यक्ष बाबाजी जाधव, कार्यकारी संचालक सुनील गुरव यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते. सामंत म्हणाले, खासदार शरद पवार हे डॉ. चोरगे यांचे नाव काढतात. यावरून त्यांच्या कामाची ओळख लक्षात येते. चोरगे यांच्या प्रोत्साहनामुळे आम्ही राजकारणात इथपर्यंत पोचलो. बॅंकेची निवडणूक कधी आहे, हे मला माहित नाही. शिवसेनेच्या लोकांना चांगले स्थान दिले तर बरं होईल. जे विरोधात उभे राहतील, त्यांच्या जागा वाटून घेऊ. तसे स्पष्ट केले तर मुख्यमंत्र्यांना सांगायला बरे पडेल. 

ते म्हणाले की, उच्च व तंत्र शिक्षण खात्यामार्फत सहकार विषयावरील अभ्यासक्रम आणला जाणार आहे. त्यात सहकारातील शिक्षणसंस्था कशा उभ्या राहतात, याचा ऊहापोह केला जाईल तसेच शासनाकडील निधी या बॅंकेत ठेवून ती अधिकाधिक सक्षम करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. 
‘पीपीपी’ तत्त्वाचा अवलंब सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९०० कोटीचे वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्यातील महाविद्यालय हे बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा, या तत्त्वावर उभारण्याचा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेतला. हे महाविद्यालय उभारण्यासाठी बॅंका, संस्था किंवा अन्य कोणी तयार असेल तर त्याचा विचार केला जाईल. यासाठी एक समिती स्थापन केली असून त्याचा अहवाल महिन्यात प्राप्त होईल, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.

सामंत म्हणाले...

- मोबाईल एटीएम व्हॅन हा उपक्रम आदर्शवत 
- शेतकरी कुटुंबातील व्यक्‍तीला त्याचा फायदा मिळणार 
- अशी व्हॅन बॅंकेने प्रत्येक तालुक्‍यात सुरू करण्याची गरज 
- त्याचा अधिकाधिक फायदा शेतकऱ्यांना होणार 
- बॅंकेतील ठेवी वाढवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com