esakal | नीट देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मदतीला धावून आले 'हे' मंत्री
sakal

बोलून बातमी शोधा

uday samant send a letter to noida national testing agency related to neet examination of konkan students

महाराष्ट्रातून सुमारे 35,000 विद्यार्थी या परीक्षेला पात्र झाले आहेत

नीट देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मदतीला धावून आले 'हे' मंत्री

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कणकवली : मानव संसाधन विकास मंत्रालयाने राज्यांच्या सहकार्याने वैद्यकीय महाविद्यालयांच्या प्रवेशासाठी नीट परीक्षांचे आयोजन केले आहे. गोवा केंद्र निवडलेल्या सिधुदुर्ग आणि रत्नागिरीतील विद्यार्थ्यांना ही परीक्षा देण्यासाठी स्वॅब चाचणीशिवाय गोवा राज्यात प्रवेश मिळावा किंवा या विद्यार्थ्यांसाठी सिंधुदुर्ग, रत्नागिरीमध्ये परीक्षेच्या केंद्राची निर्मिती करावी. जेणेकरून या विद्यार्थ्यांसाठी ते सोयीचे होईल अशी मागणी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी उत्तर प्रदेश नोएडा येथील नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे महासंचालक यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांनीही यासाठी ना. उदय सामंत यांच्याकडे पाठपुरावा केला होता.

हेही वाचा - सामाजिक क्षेत्रातून वेळ काढत आपली मूर्तीकला जपणारा मूर्तीकार..

मानव संसाधन विकास मंत्रालयाने राज्यांच्या सहकार्याने वैद्यकीय महाविद्यालयांच्या प्रवेशासाठी नीट परीक्षांचे आयोजन केले आहे. त्यानुसार देशभरातील १५५ शहरातील केंद्रांची ही परीक्षा घेण्यासाठी  निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून सुमारे 35,000 विद्यार्थी या परीक्षेला पात्र झाले आहेत. त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे 300 आणि रत्नागिरी जिल्ह्यातील 500 विद्यार्थी परीक्षेला बसत आहेत.  

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे दुर्गम व डोंगराळ जिल्हे आहेत. . याठिकाणी कनेक्टिव्हिटीच्या समस्या उर्वरित महाराष्ट्रापेक्षा जास्त आहेत. यातील काही विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्र म्हणून गोव्याची निवड केली आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोवा सरकारने गोव्यात येणाऱ्या व्यक्तींसाठी स्वॅब चाचणी अनिवार्य केली आहे. त्यामुळे दोन जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना नीट परीक्षा देण्यासाठी समस्या निर्माण होत आहे.

हेही वाचा -  निसर्गशाळेत ऑनलाईनचे धडे; कोकणातल्या युवतीची शिक्षणासाठी धडपड...

सिधुदुर्ग आणि रत्नागिरीतील विद्यार्थ्यांसाठी स्वॅब चाचणीत शिथिलता आणावी. त्यांना परवानगी द्यावी. गोव्यात परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वॅब चाचणीशिवाय गोवा राज्यात प्रवेश मिळावा किंवा सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये परीक्षेच्या केंद्राची निर्मिती करावी. जेणेकरून विध्यार्थ्यांसाठी सोयीचे होईल अशी मागणी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी उत्तर प्रदेश नोएडा येथील नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या महासंचालकांना केली आहे.

संपादन - स्नेहल कदम 

loading image
go to top